विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश निवडणुकीवर डोळा ठेऊन आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरवाल यांनी दिल्लीत राममंदिराची प्रतिकृती बनविली आहे. दिवाळीच्या निमित्ताने केजरीवालांसह संपूर्ण मंत्रीमंडळ जाऊन या मंदिरात पूजा करणार आहे.Kejriwal’s Ram Bhakti in view of Uttar Pradesh elections, replica of Ram Mandir built in Delhi, entire cabinet to pay homage
कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनीही लोकसभा निवडणुकांच्या अगोदर सॉफ्ट हिंदूत्वाची प्रतिमा निर्माण करण्यासाठी मंदिरांच्या यात्रा केल्या होत्या. केजरीवाल यांनी तर त्याच्याही पुढे पाऊल टाकले आहे.
उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत जाऊन केजरीवाल यांनी रामंदिराचे दर्शन घेतले होते. त्यांनी उत्तर प्रदेशातील आपल्या निवडणूक प्रचाराचा मुद्दा राम मंदिर करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी दिल्लीतील प्रयागराज स्टेडियममध्ये अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिराची प्रतिकृती बनविण्यात येत आहे.
दिवाळीच्या दिवशी चार नोव्हेंबरला केजरीवाल आपल्या संपूर्ण मंत्रीमंडळासह येथे येणार असून पूजा करणार आहेत.आम आदमी पक्षाने उत्तर प्रदेशातील निवडणुकीत ताकदीने उतरायचे ठरविले आहे. त्यासाठी हिंदूत्वाचा आधार घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार राम मंदिर उभारणीचे श्रेय घेत आहे. त्याला उत्तर देण्याची केजरीवालही आपली हिंदूत्वाची प्रतिमा तयार करत आहेत.
Kejriwal’s Ram Bhakti in view of Uttar Pradesh elections, replica of Ram Mandir built in Delhi, entire cabinet to pay homage
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान