विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सकाळी 9.00 वाजेपर्यंतच्या कलांमधून एक बाब स्पष्ट होत आहे, ती म्हणजे गुजरात मध्ये आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे लेख चॅलेंज फेल झाले आहे, पण नरेंद्र का रेकॉर्ड भूपेंद्र तोडेगा ही भाजपची घोषणा मात्र यशस्वी होताना दिसत आहे. Kejriwal’s Likh Lo Challenge Fails in Gujarat
निवडणुकीत कुठले तरी एखादे वक्तव्य अथवा एखादे घोषणा लोकप्रिय होत असते. तसा अरविंद केजरीवालांनी प्रयत्न केला होता. लिख लो चॅलेंज इस बार गुजरात मे सत्ता पलटेगी, असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यानंतर आम आदमी पार्टीने गुजरातच्या सर्व प्रचारात केजरीवालांचे ते वक्तव्य वापरले. पण प्रत्यक्ष निकालांचा कल पाहता केजरीवाल्यांचे हे वक्तव्य फेल झाल्याचे दिसून येत आहे. कारण सकाळी 9.00 वाजेपर्यंतच्या निकालांमधल्या काळामध्ये अरविंद केजरीवालांची आम आदमी पार्टी फक्त दोन जागांवर आघाडीवर दिसत आहे.
त्या उलट भाजपने मात्र संघटनेच्या बळावर नरेंद्र का रेकॉर्ड भूपेंद्र तोडेगा असे जाहीर आव्हान स्वतःच घेतले होते. नरेंद्र मोदी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना 2012 मध्ये 127 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. 2017 च्या निवडणुकीत मात्र भाजप 100 च्या आत 99 थांबला होता. हा शंभरी घसरण्याचा धोका टाळण्यासाठीच भाजपने 2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत यावेळी नरेंद्र का रेकॉर्ड भूपेंद्र तोडेगा हे चॅलेंज स्वतःलाच घेतले होते.
मोदींचे रेकॉर्ड मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल तोडतील, असा त्याचा अर्थ होता. निवडणुकीतील मतमोजणीचा सकाळी नऊ वाजेपर्यंतचा आढावा घेतला तर भाजपचे उमेदवार 131 जागांवर आघाडीवर आहेत. याचा अर्थ नरेंद्र का रेकॉर्ड भूपेंद्र तोडेगा हे चॅलेंज सध्या तरी पूर्ण होताना दिसत आहे.
Kejriwal’s Likh Lo Challenge Fails in Gujarat
महत्वाच्या बातम्या