विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रीग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने अटक केल्यानंतर अरविंद केजरीवालांनी आज सकाळी तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण हायकोर्टातच मुख्य आर्ग्युमेंट व्हायचे आहे. तिथे कुठला फटका मिळण्याआधीच सुप्रीम कोर्टाचे “ब्रह्मास्त्र” वापरून आपण चूक केली, असे लक्षात येताच केजरीवालांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेला अर्ज स्वतःहून मागे घेतला. अरविंद केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केजरीवालांनी स्वतःहून आपला अर्ज मागे घेतल्याचे सुप्रीम कोर्टात सांगितले. Kejriwal withdraws plea against arrest from SC, to contest remand proceedings before trial court
पण आज सकाळी अभिषेक मनू शिंगवे यांनी सुप्रीम कोर्टात तातडीचा विषय म्हणून अरविंद केजरीवालांच्या केसच्या सुनावणीचा आग्रह धरला होता. त्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तो विषय तातडीने न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडापीठाकडे वर्ग केला. पण त्या खंडपीठामुळे सुरुवातीलाच आर्ग्युमेंट करताना अभिषेक मनू सिंघवी यांनी अरविंद केजरीवाल सुप्रीम कोर्टातला अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले.
पण केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन सुरुवातीला अर्ज केला आणि नंतर तो मागे घेतला हे सहज घडले नाही. केजरीवाल यांच्या केसची सुनावणी दिल्ली हायकोर्टात आहे. तिथे सुनावणीमध्ये कुठला फटका बसला, तर नंतर सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची संधी देखील मिळणार नाही, याची भीती केजरीवालांना वाटली. कारण एकाच वेळी सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टाने कुठला वेगळाच निर्णय देऊन आपल्याला अडचणीत आणले, तर पुन्हा त्या कोर्टात धाव घेण्याची संधी देखील शिल्लक राहणार नाही, अशी भीती केजरीवालांना वाटली. त्या उलट हायकोर्टाने कुठलाही निर्णय दिला, तर नंतर सुप्रीम कोर्टात दाद तरी मागता येईल हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे “ब्रह्मास्त्र” हायकोर्टाच्या सुनावणीच्या आधीच वापरले, तर ते फुकट जाईल, याची जाणीव होताच त्यांनी सुप्रीम कोर्टातला अर्ज मागे घेऊन “सेफ गेम” खेळला.
Kejriwal withdraws plea against arrest from SC, to contest remand proceedings before trial court
महत्वाच्या बातम्या
- पृथ्वीराज चव्हाणांच्या पक्षनिष्ठेला अखेर हायकमांडकडून “न्याय”; काँग्रेसची महाराष्ट्रातील प्रचारसूत्रे बाबांच्या हाती!!
- मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळेचे ASI सर्वेक्षण उद्यापासून सुरू होणार
- निवडणुकीच्या तोंडावर अटकेचा केजरीवालांचा कांगावा, पण त्यांनीच आधी टाळली होती ED ची तब्बल 9 समन्स!!
- दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधी, ईडीचे पथक पोहचले केजरीवालांच्या घरी!