• Download App
    पाकिस्तानी नेता भारताच्या निवडणुकीत नाक खूपसतोय महिनाभरापासून; पण त्याला केजरीवालांनी फटकारले मतदानाच्या दिवशी!!|Kejriwal targets Pakistani minister Chaudhry fawad Hussein on the voting day

    पाकिस्तानी नेता भारताच्या निवडणुकीत नाक खूपसतोय महिनाभरापासून; पण त्याला केजरीवालांनी फटकारले मतदानाच्या दिवशी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी मंत्री आणि इमरान खान यांचा कट्टर समर्थक चौधरी फवाद हुसेन गेल्या महिन्या – दीड महिन्यापासून भारतातल्या निवडणुकीमध्ये नाक खूपसतोय. मोदीविरोधात वेगवेगळी ट्विट करून काँग्रेस आणि बाकीच्या पक्षांना समर्थन देतोय. भारतातल्या लोकशाही संरक्षणाविषयी गळा काढतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्याच्या वेगवेगळ्या ट्विटची दखल घेऊन त्याला प्रत्युत्तर देखील दिले. परंतु काँग्रेस किंवा बाकीच्या कुठलीही विरोधी नेत्यांनी त्याविषयी “ब्र” शब्द देखील उच्चारला नव्हता.Kejriwal targets Pakistani minister Chaudhry fawad Hussein on the voting day



    पण आज दिल्ली मधल्या 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये आणि पंजाब मधल्या 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चौधरी फवाद हुसेन याला फटकारले आहे. चौधरीसाहेब, आम्ही भारतातले लोक आमच्या देशातल्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहोत. त्यासाठी तुमच्या ट्विटची गरज नाही. तुमच्या देशाची परिस्थिती गंभीर आहे. तिच्याकडे लक्ष द्या दहशतवादाला पोहसणाऱ्या देशाच्या कुठल्याही नेत्याच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही, अशा कठोर शब्दांमध्ये ट्विट करून अरविंद केजरीवाल यांनी चौधरी फवाद हुसेन यांना फटकारले.

    पण हा फटकारण्याचा दिवस मात्र केजरीवालांनी दिल्लीतल्या मतदानाचा निवडला. त्याआधी केजरीवाल किंवा बाकीच्या कुठल्याही विरोधी पक्षाच्या नेत्याने चौधरी फवाद हुसेनला फिटकारल्याचे उदाहरण एवढे ठळकपणे दिसले नाही. त्यामुळे केजरीवाल यांच्या पाकिस्तान विरोधी भूमिकेभोवती संशय निर्माण झाला.

    Kejriwal targets Pakistani minister Chaudhry fawad Hussein on the voting day

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य