Tuesday, 6 May 2025
  • Download App
    केजरीवाल नव्या अडचणीत! 16 मार्चला कोर्टात हजर राहण्याचे आदेश|Kejriwal ordered to appear in court on March 16 in new trouble

    केजरीवाल नव्या अडचणीत! 16 मार्चला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

    जाणून घ्या , काय आहे संपूर्ण प्रकरण


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या दुसऱ्या तक्रारीवर राऊस एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना १६ मार्चला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.Kejriwal ordered to appear in court on March 16 in new trouble



    अबकारी धोरणाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीत समन्सचे पालन न केल्याबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्याची विनंती करणारी ईडीने राऊस एव्हेन्यू न्यायालयात नवीन तक्रार दाखल केली आहे.

    अधिकृत सूत्रांनी सांगितले की, नवीन तक्रार आम आदमी पार्टी (आप) चे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांना फेडरल प्रोब एजन्सीद्वारे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ऍक्ट (PMLA) च्या कलम 50 अंतर्गत पाठवलेल्या समन्स क्रमांक 4 ते 8 चे पालन न करण्याशी संबंधित आहे.

    याआधीही, ईडीने राऊस एव्हेन्यू न्यायालयात याचिका दाखल करून केजरीवाल यांना जारी केलेल्या पहिल्या तीन समन्सवर हजर न राहिल्याबद्दल त्यांच्यावर खटला चालवण्याची मागणी केली होती. ईडीच्या पहिल्या तक्रारीवर राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांना 16 मार्च रोजी समन्स बजावले होते.

    Kejriwal ordered to appear in court on March 16 in new trouble

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    MP Nishikant Dubey : खासदार निशिकांत दुबे यांच्याविरुद्धची अवमान याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

    Nirmala Sitharaman : अर्थमंत्र्यांनी आशियाई बँकेला पाकला मदत थांबवण्यास सांगितले; बँकेच्या संचालकांना भेटल्या सीतारामन

    Putin : पुतीन म्हणाले- दहशतवादाविरुद्ध भारताला पूर्ण पाठिंबा; PM मोदींना सांगितले- पहलगामच्या दोषींना कोर्टासमोर आणले पाहिजे

    Icon News Hub