विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मनी लॉंडरिंग प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता कायद्याचा बडगा बसून मुख्यमंत्री पदाची खुर्ची जाण्याची भीती निर्माण झाली आहे आणि त्या भीतीतूनच केजरीवाल्यांना समर्थक आम आदमी पार्टीने पंतप्रधानांचे निवासस्थान घेरण्याची तयारी चालवली आहे.Kejriwal losing the Chief Ministership; Aam Aadmi Party is preparing to surround the Prime Minister’s residence!!
दिल्लीचे मंत्री गोपाळ राय यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेरण्याचे आंदोलन करण्याची घोषणा सकाळी केली त्या पाठोपाठ दिल्ली पोलीस हाय अलर्ट वर येऊन त्यांनी पटेल चौक मेट्रो स्टेशन पासून सगळीकडे बंदोबस्तात वाढ करून परिसरात 144 कलम लावले. आम आदमी पार्टीला कुठल्याही प्रकारचे आंदोलन करण्याची परवानगी नाकारली. अकबर रोड, केमाल आतातुर्क रोड, सफदरजंग रोड, तीन मूर्ती चौक अशा दिल्लीच्या 7 मार्गांवर नागरिकांनी येण्याचे टाळावे, असे आवाहन केले. त्यामुळे आम आदमी पार्टीची पंतप्रधान निवासस्थान घेण्याची मोहीम फसण्याच्या बेतात आली.
पण मूळात पंतप्रधान निवासस्थान गिरणीची वेळच आम आदमी पार्टीवर का आली??, याचा आढावा घेतल्यावर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आपली खुर्ची जाण्याची भीती वाटली म्हणून पंतप्रधान निवासस्थान घेरण्याची वेळ आली, असे स्पष्ट झाले. मनी लॉंडरिंग प्रकरणात ईडीच्या कोठडीत गेल्यानंतरही अरविंद केजरीवाल हट्टाने कोठडीतूनच दिल्लीचे सरकार हाकत आहेत. कोठडीतून ते रोज वेगवेगळे आदेश काढून ते आपल्या मंत्री अतिशी मार्लेना यांना पाठवत आहेत आणि अतिशय मार्लेना ते आदेश जाहीररित्या वाचून अधिकाऱ्यांना निर्देश देत आहेत.
पण या सगळ्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय कायदेशीर कारवाईची आजमावणी करत आहे. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत म्हणजे ते लोकसेवक आहेत आणि कोणत्याही लोकसेवकाला भ्रष्टाचार किंवा अन्य कुठल्याही गुन्ह्यात अटक झाली, तर कायदेशीर प्रक्रियेद्वारे त्याला ताबडतोब निलंबित करण्यात येते. तशाच प्रकारची कायदेशीर कारवाई करून अरविंद केजरीवालांचा हट्ट मोडीत काढायची गृह मंत्रालयाची तयारी चालू आहे आणि याची भनक लागल्यामुळेच अरविंद केजरीवाल समर्थक आम आदमी पार्टीने थेट पंतप्रधानांचे निवासस्थान घेरण्याची मोहीम चालवली, पण तिला दिल्ली पोलिसांनी ब्रेक लावला आहे.
Kejriwal losing the Chief Ministership; Aam Aadmi Party is preparing to surround the Prime Minister’s residence!!
महत्वाच्या बातम्या
- नागपुरात काँग्रेसला झटका, आमदारकीचा राजीनामा देत राजू पारवेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
- के. सुरेंद्रन यांना वायनाडचे “स्मृती इराणी” होण्याची संधी; कमळावर बसून राहुल गांधींविरुद्ध स्वारी!!
- सोलापुरातून कमळावर राम सातपुते, तर सुनील मेंढे आणि अशोक नेते यांनाही भाजपची तिकिटे!!
- कंगना राणावत, अरुण गोविल भाजपकडून लोकसभेच्या मैदानात; नवीन जिंदाल सीता सोरेन यांच्यासह 115 उमेदवारांची यादी जाहीर!!