• Download App
    भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यापुढे केजरीवालांचा आदर्श, दिल्लीत शिला दीक्षित यांचा झाला होता तसा योगी आदित्यनाथांचा करायचाय पराभव|Kejriwal is role model of Chandrshekhar Aazad, want to defeat Yogi Aaditynath

    भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यापुढे केजरीवालांचा आदर्श, दिल्लीत शिला दीक्षित यांचा झाला होता तसा योगी आदित्यनाथांचा करायचाय पराभव

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी तत्कालिन मुख्यमंत्री शिला दीक्षित यांच्या मतदासरंघात उभे राहून त्यांचा पराभव केला होता. भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यासमोर हाच आदर्श आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात गोरखपूर मतदारसंघातून ते लढणार आहेत.Kejriwal is role model of Chandrshekhar Aazad, want to defeat Yogi Aaditynath

    चंद्रशेखर आझाद यांनी योगी आदित्यनाथ यांना जाहीर चर्चेचे आव्हान दिले आहे. वृत्तवाहिन्यांनी त्यासाठी तारीख निश्चित करावी असेही त्यांनी म्हटले आहे. आझाद म्हणाले, मी काही दिवसांपासून म्हणत होतो की योगी जेथून निवडणूक लढवतील तेथे मी निवडणूक लढवणार आहे.



    आदित्यनाथ यांनी खूप उशिरा निर्णय घेतला. प्रथम ते मथुरा, नंतर अयोध्या, नंतर ते त्यांच्या सुरक्षित क्षेत्र, गोरखपूरमध्ये गेले. पण गोरखपूरच्या जनतेला त्यांच्या सरकारचा हुकूमशाही, गुंडागर्दी आणि भ्रष्टाचाराची पूर्ण कल्पना आहे.

    मी माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर, मला नवीन सरकारची मागणी करणारी 30,000 समर्थन पत्रे मिळाली. आदित्यनाथ यांनी आगामी निवडणुकीत मथुरा किंवा अयोध्येत निवडणूक लढविली तरी आपण त्यांच्याविरोधात लढण्यास तयार आहोत. योगींबरोबर खऱ्या मुद्यांवर वादविवाद होण्याची वाट पाहत आहे.

    त्यानंतरच लोक त्यांच्या कामाचा माणूस कोण आहे हे समजू शकतील. ते मला कधीही पराभूत होऊ देणार नाहीत. एक वेळ अशी येईल अहंकारामुळे निरपराध लोकांवर केलेल्या दडपशाहीला लोक कंटाळून जातील.

    आझाद यांनी बहुजन समाज पार्टीवरही जोरदार हल्ला चढवला. बहुजन समाज पक्ष संस्थापक कांशीराम यांचा वारसा विसरत चालला आहे. त्यांच्याच विचारांची हत्या केली जात आहे.

    Kejriwal is role model of Chandrshekhar Aazad, want to defeat Yogi Aaditynath

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य