• Download App
    ईडीच्या सर्व समन्सविरुद्ध केजरीवाल हायकोर्टात; तपास यंत्रणेने 21 मार्चला चौकशीसाठी बोलावले|Kejriwal in HC against all ED summons; The investigating agency called for an inquiry on March 21

    ईडीच्या सर्व समन्सविरुद्ध केजरीवाल हायकोर्टात; तपास यंत्रणेने 21 मार्चला चौकशीसाठी बोलावले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ईडीच्या सर्व समन्सना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. बुधवारी 20 मार्च रोजी उच्च न्यायालयात त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना आतापर्यंत 9 समन्स पाठवले आहेत. दिल्ली जल बोर्डाच्या निविदा प्रकरणातही समन्स पाठवण्यात आले होते. केजरीवाल एकदाही तपास यंत्रणेसमोर हजर झाले नाहीत. दिल्ली जल बोर्ड प्रकरणात सोमवारी त्यांना बोलावण्यात आले होते, मात्र ते गेले नाहीत. तर दारू पॉलिसी प्रकरणी त्यांना गुरुवार 21 मार्च रोजी बोलावण्यात आले आहे.Kejriwal in HC against all ED summons; The investigating agency called for an inquiry on March 21



    दिल्ली जल बोर्ड प्रकरण AAPने समन्स बेकायदेशीर म्हटले

    दिल्ली जल बोर्डाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले नाहीत. ईडीने त्यांना 17 मार्चला समन्स पाठवले होते आणि 18 मार्चला चौकशीसाठी बोलावले होते. केजरीवाल न जात असल्याची माहिती देताना आम आदमी पक्षाने ईडीचे हे समन्स बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. कोर्टातून अंतरिम जामीन मंजूर असताना पुन्हा पुन्हा समन्स का पाठवले जात आहेत, असे आप म्हणाले. ईडीच्या माध्यमातून भाजप केजरीवालांना टार्गेट करत असल्याचे आपचे मत आहे.

    वास्तविक, सीबीआयने जुलै 2022 मध्ये बोर्डाच्या निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचार आणि लाचखोरी प्रकरणी एफआयआर नोंदवला होता. सीबीआय एफआयआरच्या आधारे, ईडीने दिल्ली जल बोर्डाच्या निविदा प्रक्रियेतील अनियमिततेच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांची चौकशी सुरू केली होती.

    मद्य धोरण प्रकरणी केजरीवाल यांना ईडीकडून 9 समन्स

    मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने आतापर्यंत अरविंद केजरीवाल यांना नऊ समन्स पाठवले आहेत. 17 मार्चपूर्वी केजरीवाल यांना 27 फेब्रुवारी, 26 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 17 जानेवारी, 3 जानेवारी, 21 डिसेंबर आणि 2 नोव्हेंबरला समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, ते एकदाही चौकशीसाठी हजर झाले नाही.

    Kejriwal in HC against all ED summons; The investigating agency called for an inquiry on March 21

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!