वृत्तसंस्था
रायपूर : मोदी विरोधकांच्या इंडिया गाडीची आघाडीची मुंबईत 31 ऑगस्ट 1 सप्टेंबर रोजी बैठक होणे अपेक्षित आहे. मात्र त्यापूर्वीच “इंडिया” आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये राजकीय घमासान सुरू झाले आहे. छत्तीसगड मध्ये “इंडिया” आघाडीला सुरुंग लावत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस सरकार विरोधात दंड थोपटले आहेत. आम आदमी पार्टीच्या मेळाव्यात केजरीवालांनी छत्तीसगड मधील नागरिकांना 300 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. Kejriwal imposed fine against Congress governmen
केजरीवाल यांनी आज पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह छत्तीसगडच्या दौरा केला. रायपूर मध्ये आम आदमी पार्टीच्या मेळाव्यात त्यांनी काँग्रेस आणि आधीच्या भाजप सरकारला धारेवर धरले. आपण जादूगार आहोत. आपल्यासारखी जादू अमेरिका, इंग्लंड, जपान यांच्यासारख्या विकसित देशांनाही जमत नाही. दिल्लीत आपणच नागरिकांना वीज मोफत दिली. पंजाब मध्ये सरकार आल्यानंतर तिथल्या नागरिकांना वीज मोफत दिली. त्यामुळे महागाईत जनतेचे पैसे वाचले आता सर्वसामान्य दूध विक्रेते देखील वेळेत बिले देऊ शकतात, अशी माहिती मुख्यमंत्री भगवंत माने यांनी मला दिली. छत्तीसगडमध्येही आम आदमी पार्टीचे सरकार आल्यानंतर इथल्या नागरिकांना 24 तास आणि 300 युनिट वीज मोफत मिळेल. त्यामुळे जनतेचे जीवन सुसह्य होईल, अशी घोषणा केलेली केजरीवाल यांनी केली.
यावेळी त्यांनी छत्तीसगड मधल्या काँग्रेसच्या भूपेश बघेल सरकारचे वाभाडे काढले. छत्तीसगड मधल्या दोन्ही पक्षांच्या म्हणजे काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी आपल्या सात पिढ्या बसून खातील एवढी कमाई केली आहे. विजेच्या बाबतीत छत्तीसगड स्वयंपूर्ण राज्य आहे. इथे सरप्लस वीज उत्पादन होते. पण नागरिकांना 24 तास वीज मिळत नाही. ग्रामीण भागात जनतेचे विजय अभावी जास्त हाल आहेत. आम आदमी पार्टीचे सरकार छत्तीसगड मध्ये आल्यानंतर संपूर्ण राज्यात मोफत 300 युनिट वीज मोफत दिली जाईल, अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली.
केजरीवाल यांच्या या रायपूर दौऱ्यामुळे “इंडिया” आघाडीला सुरुंग लागला आहे. छत्तीसगड मध्ये आम आदमी पार्टीची निवडणुकीत इंट्री झाल्याने विधानसभा निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी द्विपक्षीय न राहता ती त्रिपक्षीय होईल आणि “इंडिया” आघाडीत मोठी फूट पडली आहे.
बंगलोर मध्ये गेल्याच महिन्यात झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत अरविंद केजरीवाल सामील झाले होते. आता 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला इंडियाची मुंबईत बैठक होणार आहे. पण दरम्यानच्या काळात केजरीवाल यांनी छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार विरुद्ध दंड थोपटल्याने “इंडिया” आघाडीला सुरुंग लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
Kejriwal imposed fine against Congress governmen
महत्वाच्या बातम्या
- ‘’आगामी निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास नितीन गडकरी …’’ रोहित पवारांचं मोठं विधान!
- द फोकस एक्सप्लेनर : राष्ट्रवादी नेमकी कुणाची? निवडणूक आयोग कोणत्या आधारावर घेते निर्णय? वाचा सविस्तर
- PM Jan Dhan Yojana : जन धन खात्यांची संख्या ५० कोटींच्या पुढे, सरकारने सांगितले इतके लाख कोटी रुपये जमा
- पंतप्रधान मोदी दोन दिवसीय दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार; ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार