विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्यात सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला असला, तरी केजरीवालांचे सुटकेचे अधिकार अत्यंत मर्यादित केले आहेत. Kejriwal granted interim bail; not allowed to visit CM office or Secretariat during bail
सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना पुढील अटींवर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ते 50,000 रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका भरतील. ते मुख्यमंत्री कार्यालय आणि दिल्ली सचिवालयाला भेट देणार नाहीत. दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरची मंजुरी मिळवण्यासाठी आवश्यक आणि आवश्यक असल्याशिवाय ते अधिकृत फाइल्सवर स्वाक्षरी करणार नाहीत, ते लेफ्टनंट गव्हर्नरच्या वक्तव्याला आणि कृतीला बांधील राहतील.
याचा अर्थ केजरीवाल फक्त निवडणूक प्रचार आणि दौरे यातच सहभागी होऊ शकतील. ते पत्रकार परिषद घेऊ शकतील. पण मुख्यमंत्री म्हणून कोणतेही सरकारी कामकाज करू शकणार नाहीत.
फक्त प्रचार + मतदानापुरते बाहेर
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दारू घोटाळ्याच्या आरोपाखाली 1 एप्रिल पासून तुरुंगात होते. प्रत्येक आठवड्याला त्यांच्या जामीनावर वेगवेगळ्या कोर्टांमध्ये सुनावणी झाली. परंतु प्रत्येक कोर्टाने त्यांचा जामीन नाकारला. दरम्यानच्या काळात लोकसभेच्या निवडणुकीतले मतदानाचे पहिले 3 टप्पे पूर्ण झाले. उरलेले 4 टप्पे टप्पे पूर्ण होणार आहेत. त्यामध्ये पंजाब आणि दिल्ली अशा दोन आम आदमी पार्टीच्या राजवटी असलेल्या राज्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल आपल्या अंतरिम जामीनाच्या काळात या 2 राज्यांमध्ये प्रचार करू शकतील, तसेच त्यांना हवे तर इतर राज्यांमध्ये पण जाऊ शकतील. पत्रकार परिषदा घेऊ शकतील. तेवढी मुभा त्यांना सुप्रीम कोर्टाने दिली आहे.
लोकसभेसाठी 25 मे रोजी दिल्लीत मतदान होणार आहे. दिल्लीत लोकसभेच्या 6 जागा आहेत. अरविंद केजरीवाल यांना 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मिळाला. 2 जून रोजी त्यांना पुन्हा पोलिसांपुढे आत्मसमर्पण कराव लागेल.
Kejriwal granted interim bail; not allowed to visit CM office or Secretariat during bail
महत्वाच्या बातम्या
- सुप्रीम कोर्टात केजरीवाल यांच्या जामिनाला ईडीचा विरोध; प्रचार हा मूलभूत अधिकार नाही
- PM मोदी-राहुल गांधींना जाहीर चर्चेचे आव्हान; 2 माजी न्यायमूर्ती आणि एका पत्रकाराने लिहिले पत्र
- महायुतीला पवारांनी महाराष्ट्रात 12 ते 13 जागा “दिल्या”; किती उदार अंत:करण साहेबांचे, म्हणत फडणवीसांनी उडवली खिल्ली!!
- सौरऊर्जा उत्पादनात भारत पोहचला तिसऱ्या स्थानावर, जपानला टाकलं मागे!