कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीमध्ये ऑक्सिजनची प्रचंड कमतरता होती. या काळात नागरिकांना ऑक्सिजनचा पुरवठा करणे दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांचा गुन्हा झाला. केजरीवाल सरकारने उरफाट्या नितीने आदेश गुप्ता यांना औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कित्येक तास चौकशी करण्यात आली.Kejriwal govt’s extravagant policy, supply of oxygen to Delhi a crime, BJP president questioned for hours
विशेष प्रतिनिधी
दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीमध्ये ऑक्सिजनची प्रचंड कमतरता होती. या काळात नागरिकांना ऑक्सिजनचा पुरवठा करणे दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांचा गुन्हा झाला. केजरीवाल सरकारने उरफाट्या नितीने आदेश गुप्ता यांना औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कित्येक तास चौकशी करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाने याबाबत म्हटले आहे की, न्यायालयाच्या निर्देशांचा चुकीचा अर्थ लावून केजरीवाल सरकार गैरवापर करत आहे. ऑक्सिजन, औषधे आणि कोरोनासाठी आवश्यक इतर साहित्याच्या काळाबाजाराचा तपास करण्याऐवजी केजरीवाल सरकार राजकीय सूडबुध्दीने वागत आहे.
औषध प्रशासन विभागाने आदेश गुप्ता यांना नोटीस दिली आहे. कोरोनाच्या दुसºया लाटेत गुप्ता यांनी रुग्णांसाठी आॅक्सिजन व्हॅन पुरविल्या होत्या. त्याबाबत त्यांची चौकशी करण्यात आली.औषध प्रशासन विभागाचे चार अधिकारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आले.
त्यांनी सुमारे दोन तास अध्यक्ष आदेश गुप्ता यांची चौकशी केली. त्याचबरोबर गुप्ता यांना एक प्रश्नावलीही देण्यात आली आहे, असे भाजपाच्या वतीने सांगण्यात आले.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीमध्ये ऑ क्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. तज्ज्ञांच्य गटाने वारंवार सांगूनही केजरीवाल सरकारने ऑक्सिजनची व्यवस्था केली नाही.
त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्थांसह भारतीय जनता पक्षानेही रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, याबाबत कृतज्ञता दाखविण्याऐवजी केजरीवाल सरकार राजकारण करत आहेत, असा आरोपही होत आहे.
Kejriwal govt’s extravagant policy, supply of oxygen to Delhi a crime, BJP president questioned for hours
महत्त्वाच्या बातम्या
- Gautam Adani : तीन दिवसांत गमावले 69 हजार कोटी, आशियातील श्रीमंतांच्या यादीतील दुसरा क्रमांकही गमावला
- नोव्हाव्हॅक्स लस प्रभावी ठरल्यानंतर आता सीरमकडून जुलैमध्ये लहान मुलांवरील चाचणीला सुरुवात
- पुतण्यावर काका वरचढ : पशुपती पारस बनले लोजपाचे नवे अध्यक्ष, राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत निर्णय
- Twitter Shares Slips : ट्विटरला मोदी सरकारशी संघर्ष महागात, 4 महिन्यांत 25 टक्क्यांनी शेअर्स घसरले
- Edible Oil Prices : सरकारने खाद्य तेलांवरील आयात शुल्क घटवले, किमतींमध्ये एवढी झाली कपात