नाशिक : दिल्लीच्या दारू घोटाळ्याच्या चौकशी आणि तपासासाठी बोलवणारे सक्तवसुली संचालनालय अर्थात ED चे तिसरे समन्स दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टाळले आणि शीर्षकात दिलेली काव्यपंक्ती सुचली, “हा रुसवा सोड सख्या, पुरे हा बहाणा ED चा बुलावा”!! Kejriwal ED approach as he skips third summons
कारण आत्तापर्यंत ED ने अरविंद केजरीवालांना दारू घोटाळ्याच्या चौकशीसाठी तिसऱ्यांदा समन्स पाठविले, पण प्रत्येक वेळी अरविंद केजरीवालांनी ED च्या सहसंचालकांना पत्र लिहून वेगवेगळी कारणे देत ED च्या कार्यालयात हजर राहून चौकशीला सामोरे जाणे टाळले. आजच्या तिसऱ्या समस्या वेळी अरविंद केजरीवाल यांनी ED च्या समन्स विषयी मूलभूत शंका उपस्थित करीत त्याला कायद्याचा आधार मागितला आणि त्यापलीकडे जाऊन दिल्ली प्रदेशाच्या राज्यसभेच्या निवडणुका आणि त्यानंतर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाची तयारी करायची असल्यामुळे आपण खूप “एंगेज” आहोत त्यामुळे समन्सनुसार आपण ED च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहू शकत नाही, असे केजरीवाल यांनी पत्रात नमूद केले. पण असली कारणे आणि बहाणे देण्याची केजरीवाल यांची ही काही पहिलीच वेळ नव्हे.
यापूर्वी देखील केजरीवाल यांनी दोनदा अशीच वेगवेगळी कारणे देऊन आणि बहाणे करून ED च्या चौकशी आणि तपासला सामोरे जाणे टाळले होते.
यापूर्वी ED ने त्यांना 2 नोव्हेंबर 2023 रोजी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहायला सांगितले होते. परंतु त्यावेळी केजरीवाल यांनी भलतेच कारण देत हजर राहणे टाळले. त्यानंतर ED ने 21 डिसेंबर 2023 रोजी चौकशीसाठी हजर राहायला सांगितले होते. त्यावेळी केजरीवाल यांनी 5 राज्यांच्या निवडणुकांचा हवाला देत आपण त्या राज्यामध्ये प्रचारामध्ये मग्न असू त्यामुळे चौकशीला हजर राहता येणार नाही,असा बहाणा केला होता.
ED च्या तिसऱ्या समन्सच्या वेळी म्हणजे आज 3 जानेवारी 2024 रोजी केजरीवाल यांनी 19 जानेवारी रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीचा हवाला दिला आहे आणि त्या पाठोपाठ 26 जानेवारी रोजी असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या तयारीचाही हवाला दिला आहे. दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून या दोन्ही “एंगेजमेंट” आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असल्यामुळे आपण ईडीच्या चौकशीला हजर राहू शकत नाही, असे केजरीवाल यांनी ईडीच्या सहसंचालकांना कळवून टाकले.
प्रत्येक वेळी असेच कुठले ना कुठले तरी बहणे करून केजरीवाल ईडीची चौकशी टाळत आले आहेत.
– केजरीवाल बाहेर, मंत्री आत
केजरीवालांचे एक-दोन नव्हे तर तब्बल 4 मंत्री याच दारू घोटाळ्यात तिहार जेलमध्ये अडकले आहेत. त्यानंतरचा स्वतः केजरीवालांचा नंबर लागण्याची दाट शक्यता आहे. तिसरे समन्स पाठवून संशयित हजर राहिला नाही, तर कोर्टामार्फत थेट अटक वॉरंट घेऊन केजरीवालांना अटक करू शकण्याच्या स्थितीत ED येऊन पोहोचली आहे. त्यामुळे केजरीवाल ED वर कितीही रुसल्याचा बहाणा करत असले तरी त्यांचा राज्यसभा निवडणूक आणि प्रजासत्ताक दिनाची तयारी हा शेवटचाच बहाणा ठरण्याची शक्यता आहे. थेट कोर्टाचा हुकूम आणूनच ED चे अधिकारी अरविंद केजरीवालांना लवकरच अटक करण्याची दाट शक्यता आहे.
Kejriwal ED approach as he skips third summons
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : हिट अँड रनचा वाद काय? भारतातल्या कायद्याला विरोध का? परदेशात कोणते कायदे? वाचा सविस्तर
- ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार’, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा नवा नारा!
- ‘हिट अँड रन’ कायद्याची सध्या अंमलबजावणी होणार नाही, संप मागे घेण्याचे आवाहन!
- मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व्हेक्षणाचे काम बिनचूक आणि कालबद्धरितीने व्हावे