विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अयोध्येत बालक राम झाले सुप्रतिष्ठित आणि भले भले आले हिंदुत्वाच्या लाईनीत!!, असे म्हणायची वेळ आली आहे, कारण अनेक जण आता राम मंदिर झाले, मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली, याचा आनंद व्यक्त करत आहेत. या लाईनीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील नंबर लावला आहे. Kejriwal also came to the line of Hindutva
राजधानीत प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी शासकीय समारंभात बोलताना अरविंद केजरीवाल यांनी अयोध्येत बालक राम यांची भव्य मंदिरात प्रतिष्ठापना झाली ही संपूर्ण देशासाठी आणि जगासाठी आनंदाची आणि स्वाभिमानाची गोष्ट ठरली, असे सांगितले.
दिल्ली सरकार राज्यातल्या नागरिकांसाठी वेगवेगळ्या मोफत तीर्थयात्रा आयोजित करीत आहे. या तीर्थयात्रेमध्ये अयोध्येचा समावेश करण्याचा नागरिकांनी आग्रह केल्यावर तो आम्ही ताबडतोब मान्य केला आहे, असेही ते म्हणाले.
हे तेच अरविंद केजरीवाल आहेत, जे इमामांच्या सभेत दिल्ली सरकार धर्मनिरपेक्ष असल्याची दुहाई देत इमामांच्या वेतन वाढीचे समर्थन करीत होते, इतकेच नाहीतर वक्फ बोर्डाच्या लिटिगेशन मध्ये असलेल्या जमिनी सोडवण्यासाठी दिल्ली सरकार प्रयत्न करेल, असेही सांगत होते.
पण आता देशात ले वातावरण पूर्ण बदलले. हिंदुत्वाचे सामाजिक आणि राजकीय वारे वाहू लागले. त्याबरोबर केजरीवाल नावाच्या वातकुक्कुटाने वाऱ्याची दिशा ओळखून आपली मान तिकडे वळवली. केजरीवाल्यांच्या तोंडी हिंदुत्वाची भाषा आली. अयोध्येतल्या मंदिरात बालक रामांची प्रतिष्ठापना झाली ही बाब त्यांना स्वाभिमानाची आणि जगाच्या कल्याणाची वाटली.
पण त्याचबरोबर केजरीवालांच्या एका वक्तव्यातून INDI आघाडीत आधीच पडलेली फुट अधिक रुंदावली. राहुल गांधींनी दोनच दिवसांपूर्वी राम मंदिराचा लोकार्पण हा देशाचा इव्हेंट नसून तो फक्त मोदींचा इव्हेंट असल्याची टीका केली होती, इतकेच नाही तर देशात रामाची लाट वगैरे काही नाही केवळ पंतप्रधानांना हवा होता म्हणून तो मोठा इव्हेंट झाला या पलीकडे त्याचे महत्त्व नाही, असे राहुल गांधी म्हणाले होते. पण केजरीवालांच्या आजच्या वक्तव्यातून राहुल गांधींच्या वक्तव्याला छेद गेला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये आधीच INDI आघाडी मोडून टाकली आहे. त्या पाठोपाठ पंजाब मध्ये केजरीवालांचे अनुयायी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील ही आघाडी मोडून टाकली. त्या पाठोपाठ केजरीवालांनी राहुल गांधींच्या वक्तव्याला छेद देऊन आपल्या पुढच्या हिंदुत्ववादी राजकारणाची दिशा स्पष्ट केली.