• Download App
    तिहार तुरुंगातून बाहेर येताच केजरीवालांनी INDI आघाडीवर लादल्या स्वतःच्या नावाच्या 10 गॅरेंट्या!! kejariwal fourth guarantee is 'Nation first'. China has occupied our land but our central govt is denying it...

    तिहार तुरुंगातून बाहेर येताच केजरीवालांनी INDI आघाडीवर लादल्या स्वतःच्या नावाच्या 10 गॅरेंट्या!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दारू घोटाळ्यात सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरुंगा बाहेर येऊन धडक्याने प्रचाराला सुरुवात केली. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत. अमित शहा पंतप्रधान होतील. ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव वगैरे नेते तुरुंगात जातील अशी भाकिते केजरीवाल यांनी काल केली, पण त्यापुढे जाऊन आज केजरीवाल यांनी स्वतःच्या नावाच्या 10 गॅरेंट्या INDI आघाडीवर लादल्या. kejariwal fourth guarantee is ‘Nation first’. China has occupied our land but our central govt is denying it…

    अरविंद केजरीवालांनी आज दिल्लीतल्या आम आदमी पार्टीच्या आमदारांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन “केजरीवाल गॅरेंटी” या नावाने 10 गॅरेंट्या INDIA आघाडीवर लादल्या. या गॅरेंट्या जाहीर करण्यापूर्वी आपण INDI आघाडीतल्या कुठल्याही घटक पक्षाच्या कुठल्याही नेत्याशी चर्चा केली नाही, असे स्वतःच केजरीवालांनी या पत्रकार परिषदेत सांगून टाकले. त्यापलीकडे जाऊन त्यांनी या 10 गॅरेंट्या आपल्या नावाने असल्या तरी INDI आघाडीचे सरकार आले, तर त्या सरकारकडून पूर्ण करून घेण्याची गॅरंटी आपण घेतो, असे केजरीवाल म्हणाले.

    पण केजरीवालांनी दिलेल्या 10 गॅरेंट्या या INDI आघाडीवर लाजल्या गेलेल्या पहिल्याच गॅरेंट्या नाहीत. त्या आधी राहुल गांधींनी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रचार करताना एकूण 25 ते 30 गॅरेंट्या आपल्या नावाने देऊन टाकल्या. त्यादेखील पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी INDI आघाडीवरच टाकली.

    INDI आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्षाने आपापले स्वतंत्र जाहीरनामे काढले आणि त्यात 5 – 10 गॅरेंट्या टाकून दिल्या. INDI आघाडीची स्थापना झाल्यानंतर किमान पाच महाबैठका झाल्या. त्यामध्ये 26 पक्षांचे बडे नेते सामील झाले. परंतु या बड्या नेत्यांना INDIA आघाडीचा एक लोगो आणि एक जाहीरनामा तयार करता आला नाही. त्या उलट प्रत्येक घटक पक्षाने स्वतःचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये आपल्याला वाटेल तेवढ्या गॅरेंट्या टाकल्या आणि INDIA आघाडीची सत्ता आली, तर त्या पूर्ण करण्याची गॅरंटी प्रत्येकाने आपापल्या बळावर घेतली, पण त्या पूर्ण करण्याची जबाबदारी मात्र INDI आघाडीच्या संभाव्य सरकारवर टाकली. त्याचेच रिपीटेशन आज अरविंद केजरीवालांनी आपल्या नावाने 10 गॅरेंट्या जाहीर करून आज राजधानीत केले.

    अग्निवीर योजना बंद करून त्यामध्ये आत्तापर्यंत भरती झालेल्या सगळ्यांना परमनंट कमिशन देण्याची आणि भारतीय सैन्याच्या बळावर चीनच्या कब्जात असलेली सगळी जमीन भारताच्या ताब्यात परत घेण्यासाठी भारतीय सैन्याला मोकळीक देण्याची गॅरेंटी केजरीवालांनी घेतली.

    kejariwal fourth guarantee is ‘Nation first’. China has occupied our land but our central govt is denying it…

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!