• Download App
    केदारनाथ धाम यात्रा आता होणार आणखी सुकर, उत्तराखंड सरकार बांधणार सर्वात लांब रोप वे|Kedarnath Dham Yatra will now be even easier, the longest ropeway to be built by the Uttarakhand government

    केदारनाथ धाम यात्रा आता होणार आणखी सुकर, उत्तराखंड सरकार बांधणार सर्वात लांब रोप वे

    विशेष प्रतिनिधी

    डेहराडून : केदारनाथ धाम यात्रा भाविकांसाठी आणखी सुकर होणार आहे. जगातील सर्वात लांब रोपवेचं स्वप्न साकार करण्यासाठी उत्तराखंड सरकारने जोरदार काम सुरू केलं आहे. समुद्रसपाटीपासून 11,500 फूट उंचीवर उत्तराखंडच्या चार धामांपैकी एक असलेल्या केदारनाथ धाममध्ये 11.5 किमी लांबीचा रोपवे बांधला जाणार आहे.Kedarnath Dham Yatra will now be even easier, the longest ropeway to be built by the Uttarakhand government

    ज्या यात्रेसाठी यात्रेकरू जवळपास संपूर्ण दिवस घालवायचे ते आता केवळ एका तासात पूर्ण करता येणार आहे.सध्या भाविकांना गौरीकुंड ते केदारनाथ धाम असा 16 किमीचा प्रवास करावा लागतो, ज्यासाठी संपूर्ण दिवस जातो. मात्र सोनप्रयाग ते केदारनाथ असा रोपवे बांधण्यात आल्याने हा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होणार आहे.



    या रोपवेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 नोव्हेंबर रोजी केदारनाथ भेटीदरम्यान केदारनाथ आणि हेमकुंड साहिबमध्ये लवकरच रोपवेचं काम सुरू होईल, असं सांगण्यात येत होतं. आता याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

    उत्तराखंडचे पर्यटन सचिव दिलीप जवळकर यांचा हवाला देत एका अहवालात असं म्हटलं आहे की, केदारनाथ रोपवे प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी लवकरच निविदा काढल्या जातील.

    या रोपवेबाबत पूर्वी गौरीकुंड ते केदारनाथ मंदिरापर्यंत हा प्रकल्प बांधण्यात यावा अशी योजना होती. परंतु अहवालानुसार नंतर हा प्रकल्प गौरीकुंडऐवजी सोनप्रयाग येथून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला जेणेकरून जास्तीत जास्त भाविकांना त्याचा लाभ घेता येईल.

    धामकडे जाण्यासाठी 16 किमीचा ट्रेकिंग मार्ग गौरीकुंडपासून सुरू होतो तर सोनप्रयाग ते गौरीकुंड हे अंतर वाहनानं 8 किमी आहे. एकूण, सोनप्रयाग ते धाम, सुमारे 25 किलोमीटर पायी किंवा वाहनाने जावे लागते.सध्या जगातील सर्वात लांब रोपवे मेक्सिको सिटीमध्ये आहे, ज्याला केबल बस 2 म्हणून ओळखलं जातं आणि त्याची लांबी 10.55 किमी आहे.

    Kedarnath Dham Yatra will now be even easier, the longest ropeway to be built by the Uttarakhand government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे