विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात असताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 21 पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून त्यांना श्रीनगरच्या जाहीर सभेचे निमंत्रण दिले आहे. पण या निमंत्रणातून काही विशिष्ट पक्षांना काँग्रेसने वगळले देखील आहे. KCR’s unity efforts of Congress Bharat Rashtra Samithi Kho; With KCR Akhilesh, Kejriwal together in public meeting
आता या वगळलेल्या सर्वात महत्त्वाच्या पक्षाने म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने काँग्रेसच्या ऐक्य प्रयत्नांना खो दिला आहे. काँग्रेसची जाहीर सभा होण्याआधीच भारत राष्ट्र समितीची जाहीर सभा केसीआर चंद्रशेखर राव यांनी बोलावली असून त्या जाहीर सभेत समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा यांना निमंत्रित केले आहे. काँग्रेसची श्रीनगर मधली जाहीर सभा होण्यापूर्वी केसीआर चंद्रशेखर राव यांची ही जाहीर सभा तेलंगण मधल्या खम्मम मतदार संघात होणार आहे.
तेलंगण विधानसभेची 2023 मध्येच निवडणूक आहे. येथे भाजपने तगडे आव्हान चंद्रशेखर राव यांच्यापुढे उभे केले आहे. पण चंद्रशेखर राव यांनी आपली तेलंगण राष्ट्र समिती तेलंगणापूर्ती मर्यादित न ठेवता तिचे नामकरण भारत राष्ट्र समिती असे करून आपली राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा जाहीर केली आहे आणि या राष्ट्रीय महत्त्वकांक्षेलाच खतपाणी घालण्यासाठी ते खम्ममच्या जाहीर सभेचा उपयोग करून घेणार आहेत. म्हणूनच या जाहीर सभेत त्यांनी अखिलेश यादव, पिनराई विजयन, डी. राजा, अरविंद केजरीवाल भगवंत मान आदी तेलंगण बाहेरच्या महत्त्वाच्या नेत्यांना निमंत्रित केले आहे. या नेत्यांनी त्यांना अनुकूल प्रतिसाद देखील दिला आहे.
मात्र, त्यामुळे काँग्रेसच्या विरोधी ऐक्याच्या प्रयत्नांच्या आधी काँग्रेसने ज्यांना वगळले त्या केसीआर चंद्रशेखर राव यांनीच स्वतःच्या ऐक्य प्रयत्नांना मूर्त रूप देण्याची चाल खेळली आहे. हे सर्व नेते चंद्रशेखर राव यांनी बांधलेल्या दयाद्री इथल्या लक्ष्मी नरसिंह मंदिराला देखील भेट देऊन तिथे दर्शन घेणार आहेत. त्यामुळे राहुल गांधींचा जसा टेम्पल रन आहे तसाच सॉफ्ट हिंदुत्वाचा प्रयोग चंद्रशेखर राव या सर्व नेत्यांना घेऊन तेलंगणामध्ये करणार आहेत. पण त्यांचा मुख्य हेतू मात्र स्वतःच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचे दर्शन घडवणे आणि काँग्रेसच्या ऐक्य प्रयत्नांना आधी आपला ऐक्य प्रयत्न जनतेच्या मनावर ठसविण्याचा असणार आहे.
KCR’s unity efforts of Congress Bharat Rashtra Samithi Kho; With KCR Akhilesh, Kejriwal together in public meeting
महत्वाच्या बातम्या