नितीश कुमार यांनी राजीव रंजन प्रसाद यांची राष्ट्रीय प्रवक्ता पदावर नियुक्ती केली आहे.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. केसी त्यागी ( KC Tyagi ) यांनी जेडीयूच्या राष्ट्रीय प्रवक्त्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. राजीनाम्याचे कारण त्यांनी वैयक्तिक असल्याचे सांगितले आहे.
केसी त्यागी यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी राजीव रंजन प्रसाद यांना ही जबाबदारी देण्यात आली असून आता ते जेडीयूच्या राष्ट्रीय प्रवक्त्याची जबाबदारी पार पाडतील. पक्षाचे सरचिटणीस अफाक अहमद खान यांनी याबाबतची माहिती देणारे पत्र जारी केले आहे.
यासोबत जनता दल (युनायटेड)चे सरचिटणीस अफाक अहमद खान यांचे एक पत्र जारी करण्यात आले आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, “जनता दल (युनायटेड) चे राष्ट्रीय अध्यक्ष, नितीश कुमार यांनी राजीव रंजन प्रसाद यांची राष्ट्रीय प्रवक्ता पदावर नियुक्ती केली आहे.
प्रवक्ता या पदावर पक्षात असलेले केसी त्यागी, राजीव रंजन प्रसाद यांची राष्ट्रीय प्रवक्ता पदावर नियुक्ती केली आहे, या कारणामुळे त्यांनी पक्षाच्या प्रवक्त्या पदाचा राजीनामा दिला आहे.
केसी त्यागी यांनी इस्रायलच्या मुद्द्यावर विरोधकांशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर पीएम मोदींना सल्ला देताना ते म्हणाले होते की, केंद्र सरकारने इस्रायलची मदत तात्काळ थांबवावी. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्व प्रकारची चर्चा सुरू झाली आहे.
KC Tyagi resigns as JDU spokesperson
महत्वाच्या बातम्या
- Tejashwi Yadav : सॅम पित्रोदा यांचा आत्मा तेजस्वी यादवमध्ये आहे का? – भाजपचा टोला!
- Haryana assembly elections : हरियाणा विधानसभा निवडणुकीची नवी तारीख जाहीर!
- Giriraj Singh attack : बेगुसराय येथे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला
- Ladki Bahin Yojna In Nagpur : नागपुरात लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमात कृतज्ञता आणि उत्साहाची अपूर्व जोड!!