• Download App
    Kashmiri Pandits tortured by Congress, saved by BJP; Justice in Haryana after 30 years; Land for houses at last

    काश्मिरी पंडितांना काँग्रेसने मारले, भाजपने तारले; हरियाणात ३० वर्षानंतर न्याय; घरांसाठी अखेर जमीन

    वृत्तसंस्था

    चंडीगढ : काश्मीरमधून पलायन केल्यावर हरियाणातील बहादूरगडमध्ये येऊन स्थायिक झालेल्या काश्मिरी हिंदूंना तब्बल ३० वर्षांनी न्याय मिळाला. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यामुळे त्यांना घरांसाठी जमीन मिळाली आहे. Kashmiri Pandits tortured by Congress, saved by BJP; Justice in Haryana after 30 years; Land for houses at last

    १९११- १९९३ या काळात एकूण २०९ कुटुंबांनी घरे बांधण्यासाठी बहादूरगडमध्ये जमीन खरेदी केली. पण १९९५ मध्ये काँग्रेसच्या भजनलाल सरकारने या कुटुंबांची जमीन ‘सरकारी योजनेसाठी’ असे कारण देत जबरदस्ती संपादित केली. १९८९ मध्ये रातोरात आपलं राहतं घर सोडून पलायन केलेल्या या काश्मिरी हिंदूंची पुन्हा घर बनवण्यासाठी कायदेशीर पद्धतीने विकत घेतलेली जमीन पण काँग्रेसने ओरबाडून घेतली होती.

    वास्तविक, जमीन ताब्यात घेतल्यानंतर त्या बदल्यात जमीन मालकांना भूखंड देण्याची प्रथा/कायदा आहे. परंतु बहादूरगडच्या या १८२ काश्मिरी हिंदूंना तशी जमीन (मोबदला) पण देण्यास काँग्रेस सरकारने स्पष्ट नकार दिला. तेंव्हापासून, हे काश्मिरी हिंदू न्यायालयात लढा देत होते. न्यायालयात गेल्यानंतर मात्र या काश्मिरी हिंदूंनी सरकारचे व राजकारणी लोकांचे उंबरठे झिजवायचे बंद केले.
    ..मग, ‘काश्मीर फाईल्स’ आला आणि देशभरात काश्मिरी हिंदूंचा छळ, पलायन आणि पलायनानंतरही न संपलेल्या त्यांच्या यातना देशाच्या कानाकोपऱ्यात पोचल्या.
    अशात, बहादूरगडच्या या १८२ काश्मिरी हिंदूंच्या न्यायालयीन लढ्याचे प्रकरण हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या कानावर आले. त्याचक्षणी त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडून या प्रकरणाची फाईल मागवून घेतली आणि ‘मिशन वचनपूर्ती’ असं नाव देत हा विषय निकालात काढण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी वचनपूर्ती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काल मोजून दहावा दिवस होता. आणि १८२ कुटुंबांना भूखंडांचे वाटप झाले! २७ वर्षे जे झालं नाही, ते मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी १० दिवसात करून दाखवलं. बरं, फक्त कागदोपत्री नाही तर जमिनीचा ‘फिजिकल’ ताबाही या कुटुंबांना मिळाला आहे.

    Kashmiri Pandits tortured by Congress, saved by BJP; Justice in Haryana after 30 years; Land for houses at last

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार