वृत्तसंस्था
काशी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या काशी मध्ये त्यांच्याच संकल्पनेतून उत्तर प्रदेश सरकारने पहिला काशी तमिळ संगम आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रथमच काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टवर के. वेंकटरमण गणपती यांच्या रूपाने उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने पहिले तमिळ ट्रस्टी नेमले आहेत. Kashi Vishwanath Temple Trust. Venkata Raman Ganapathy First Tamil Trustee
काशी मध्ये विश्वनाथाच्या रूपाने शिव शंकरांचे पूजन आणि उपासनेची प्राचीन परंपरा आहे. तामिळनाडूमध्ये देखील शिव उपासनेची तेवढीच पुरातन परंपरा आहे. या दोन परंपरांचा संगम काशी विश्वनाथ धाम मध्ये व्हावा या हेतूने काशी तमिळ संगमचे आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून योगी आदित्यनाथ सरकारने केले आहे. यातले पहिले पाऊल म्हणून काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टवर के. व्यंकट रमण गणपती यांची ट्रस्टी म्हणून नेमणूक केली आहे.
आपल्या नेमणुकीमुळे केवळ आपला व्यक्तिगत सन्मान झाला असे नसून त्यामुळे काशी आणि तामिळनाडू यामध्ये ज्ञानाचे आणि ज्ञानपरंपरेचे आदान प्रदान होईल, अशा भावना के. वेंकट गणपती यांनी व्यक्त केल्या आहेत.
काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टवर तमिळ व्यक्तीची नेमणूक केली. तशीच नेमणूक अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्टवर करावी, दक्षिणेमध्ये मंदिर व्यवस्थापनाची उत्तम परंपरा आहे. त्याचा लाभ काशी आणि अयोध्येला होईल, अशा भावना काही समाज घटकांनी व्यक्त केल्या आहेत.
Kashi Vishwanath Temple Trust. Venkata Raman Ganapathy First Tamil Trustee
महत्वाच्या बातम्या
- म्हणे, आफताब एकलकोंडा होता, उघडा डोळे बघा नीट, त्याची “ही” एकलकोंडी!
- मेरा अब्दुल वैसा नही है!!, हिंदू मुली अशा का वागतात?
- बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिंदे – फडणवीस आज हिंदुत्वाचा वारसा कार्यक्रमात सावरकर स्मारकात एकत्र
- आफताब – श्रद्धा लव्ह जिहादवर संताप उसळला असताना मराठी माध्यमांचा व्हिक्टीम कार्ड आणि पॉझिटिव्ह स्टोरीचा फंडा