• Download App
    काशी विश्वनाथ कॉरिडॉर उद्घाटन; हर हर महादेवच्या गजरात पंतप्रधान मोदींचे काशीवासीयांकडून स्वागत; गंगा मातेचेही दर्शन। Kashi Vishwanath Corridor inauguration; Prime Minister Modi is welcomed by the people of Kashi in the wake of Har Har Mahadev; Darshan of Mother Ganga too

    काशी विश्वनाथ कॉरिडॉर उद्घाटन: हर हर महादेवच्या गजरात पंतप्रधान मोदींचे काशीवासीयांकडून स्वागत; गंगा मातेचेही दर्शन

    वृत्तसंस्था

    काशी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज काशीवासीयांनी हर हर महादेवच्या गजरात जोरदार स्वागत केले. काशीच्या रस्त्यांवरून त्यांची गाडी जात असताना अनेकांनी गाडी मध्येच थांबून मोदींना पुष्पहार घातले. पगड्या घातल्या. त्यांना रुद्राक्षाच्या माळा दिल्या. रस्त्यांवर दुतर्फा जनतेने उभे राहून मोदींच्या गाडीवर पुष्पवर्षाव केला. Kashi Vishwanath Corridor inauguration; Prime Minister Modi is welcomed by the people of Kashi in the wake of Har Har Mahadev; Darshan of Mother Ganga too

    पंतप्रधान मोदी यांनी ललिता घाटापासून कन्हैया घाटापर्यंत डबल डेकर बोटीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह प्रवास केला. यावेळी काशीच्या विविध घाटांवर जनतेने उभे राहून मोदींचे स्वागत केले.

    मोदींनी त्यांना अभिवादन केले. कन्हैया घाटावर मोदींच्या स्वागतासाठी काशीचे शेकडो तरुण डमरू वादक उपस्थित होते. त्यांनी डमरू वादन करून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी मोदींनी यांच्यासह गंगा मातेचे दर्शन घेतले.

    Kashi Vishwanath Corridor inauguration; Prime Minister Modi is welcomed by the people of Kashi in the wake of Har Har Mahadev; Darshan of Mother Ganga too

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी