विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रात आज गौरी गणपती विसर्जनाचा दिवस असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी ते G20 चे कष्टकरी भेट, असा प्रवास केला!! kashi to G20 valunteer pm modi to journey of today
आपला लोकसभा मतदारसंघ काशी मध्ये आज पंतप्रधानांचा भरगच्च कार्यक्रम होता. त्यांनी काशीमध्ये भव्य क्रिकेट स्टेडियमच्या भूमिपूजनात 1983 च्या विश्वचषक विजेत्या टीमसह सहभाग घेतला, तसेच त्यांनी उत्तर प्रदेशात 18 जिल्ह्यांमध्ये 16 अटल निवासी स्कूलचे जनतेला समर्पण केले. काशीमध्ये महिला सशक्तिकरण मेळाव्याला संबोधित केले, तसेच विद्यार्थी संमेलन देखील घेतले. त्यानंतर नवी दिल्लीत येऊन त्यांनी नियोजित कार्यक्रमानुसार भारत मंडपम मध्ये G20 मध्ये राबलेल्या कष्टकऱ्यांची भेट घेतली.
भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 शिखर संमेलन यशस्वी करण्यासाठी तब्बल 3000 कर्मचारी राबले होते, त्यांची भेट घेऊन त्यांना पंतप्रधान मोदींनी रात्रीचे भोजन दिले.
तत्पूर्वी दिवसभर ते काशीमध्ये होते. काशीमध्ये 30000 क्षमतेचे भव्य क्रिकेट स्टेडियम उभे राहत आहे. ते शिवशक्ती थीम वरच आधारित आहे. शिवाची प्रतीके डमरू, त्रिशूल, बेलपत्र यांचा स्टेडियमच्या आर्किटेक मध्ये संगम साधत हे स्टेडियम बांधले जाणार आहे. काशीच्या घाटाच्या पायऱ्यांप्रमाणे प्रेक्षकांची बसण्याची सोय असणार आहे. 2025 मध्ये तयार होणारे या स्टेडियमचे भूमिपूजन पंतप्रधानांनी केले. यावेळी त्यांच्या समावेत 1983 ची वर्ल्ड कप विजेता टीम होती. यात सुनील गावस्कर, कपिल देव, रवी शास्त्री यांच्यासह अनेक खेळाडू तसेच सचिन तेंडुलकरही होता.
महिला सशक्तीकरण संमेलनात मोदींनी 33 % महिला आरक्षण विधेयक संमत करून घेताना आलेले अनुभव विशद केले. महिलांच्या ताकदीमुळे आरक्षणाला विरोध करणारे पक्षही आरक्षणाच्या बाजूने आले किंबहुना त्यांना यावे लागले, याची आठवण त्यांनी सांगितली. विद्यार्थी संमेलनात त्यांनी काशीमध्ये टुरिस्ट गाईड या व्यवसायातल्या नव्या संधी विशद केल्या.
त्यानंतर राजधानी दिल्लीत येऊन त्यांनी भारत मंडप मध्ये g20 संमेलनात राबलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समवेत रात्रीचे भोजन घेतले.
kashi to G20 valunteer pm modi to journey of today
महत्वाच्या बातम्या
- नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस, शाळांना सुटी जाहीर; अंबाझरीसह गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने घरांमध्ये शिरले पाणी
- JDS एनडीएत सहभागी; अमित शहांना भेटल्यानंतर कुमारस्वामींची घोषणा, म्हणाले- आमची कोणतीही मागणी नाही
- लालू, राबडी, तेजस्वीसह 17 जणांना समन्स; लँड फॉर जॉब्स प्रकरणात 4 ऑक्टोबरला हजर राहावे लागणार
- बिधूडीने फिजूल हुसका दी है मक्खी; उत्तर प्रदेशच्या राजकारणात बसपाला ढकलले I.N.D.I आघाडीत!!