विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्ण होत आले असून 22 जानेवारी 2024 रोजी याच मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी विविध वैदिक आणि पुराणोक्त धार्मिक अनुष्ठाने 16 जानेवारी पासून सुरु होणार असून त्याचे प्रमुख पौरोहित्य छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करणारे गागाभट्ट यांचे वंशज काशीचे विद्वान पंडित वेदमूर्ती लक्ष्मीकांत नारायण दीक्षित हे करणार आहेत. Kashi acharya with descent from Shivaji priest to lead Ram temple consecration
श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त अयोध्येत जे विविध वेदशाखीय यज्ञ होणार आहेत, त्याचे आचार्यत्व वेदमूर्ती लक्ष्मीकांत नारायण दीक्षित यांच्याकडे असणार आहे. एकूण 121 वैदिक विद्वान पंडित या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात यज्ञकर्म करणारा असून त्यापैकी 40 पंडित हे काशीमधील विविध वेदशाखीय विद्वान आहेत. विविध धार्मिक अनुष्ठानांसाठी अयोध्येत 2 यज्ञ मंडप उभारले असून त्यामध्ये 9 यज्ञकुंडे बांधली आहेत. या यज्ञ मंडपांच्या उभारणीसाठी स्वतः 86 वर्षीय लक्ष्मीकांत नारायण दीक्षित आणि त्यांचे पुत्र वेदमूर्ती अरुण दीक्षित यांनी नुकताच अयोध्या दौरा केला.
गागाभट्ट यांचे वंशज
छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करणारे वैदिक विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या वंशातील वेदमूर्ती लक्ष्मीकांत नारायण दीक्षित यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुरादाबाद मध्ये सन 1943 मध्ये झाला. त्यांनी शुक्ल युजु:शाखीय वेदविद्वान पंडित गणेशशास्त्री दीक्षित आणि मंगलजी बादल यांच्याकडे शुक्ल यजुर्वेद आणि श्रौत स्मार्त यागांचे अध्ययन केले. आपल्या दीर्घ वैदिक कारकीर्दीत वेदमूर्ती लक्ष्मीकांत दीक्षित यांनी अनेक यज्ञयगांचे आचार्य भूषवले. अनेक शिष्य तयार केले ते शिष्य भारत आणि नेपाळमध्ये विविध ठिकाणी वेदसेवा परायण आहेत.
वेदमूर्ती लक्ष्मीकांत नारायण दीक्षित यांना वेदसम्राट, वैदिक भूषण, वैदिक रत्न, देवी अहिल्याबाई राष्ट्रीय पुरस्कार, अशोक सिंघल स्मृती भारतात्मा वेद पुरस्कार आदी पदव्या आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
Kashi acharya with descent from Shivaji priest to lead Ram temple consecration
महत्वाच्या बातम्या
- नीरा देवघर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारचे 3591.46 कोटी मंजूर; भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस पट्ट्याला लाभ!!
- नरसिंह रावांशी मधूर संबंधांवर प्रणवदांच्या डायरीतून “प्रकाश” आणि गांधी परिवाराची अंधारी बाजू उघड!!
- फडणवीसांचा अजितदादांना दणका; सुप्रिया सुळेंना नवाब मलिक यांचा कळवळा!!
- ओडिशा आणि झारखंडमध्ये बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर आयकर विभागाचे छापे