विशेष प्रतिनिधी
बेंगलोर कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करत पूर्ण बहुमताने निश्चित सत्ता मिळवली असली तरी पक्षात आता मुख्यमंत्री पदासाठी चुरस शिगेला पोहोचली आहे. आज सायंकाळी 6.00 वाजता कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन त्यामध्ये नेता निवडीची औपचारिकता पूर्ण केली जाणार असली तरी प्रत्यक्षात कर्नाटक मुख्यमंत्री मात्र हायकमांडच्या इच्छेचाच निवडला जाणार आहे पण त्याआधी चार मुख्यमंत्री पोस्टरवर दिसले आहेत. Karnataka will be the Chief Minister on the wish of the High Command
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात मानली जात असली तरी बी. एम. पाटील आणि जी. परमेश्वरन यांची देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. या सर्व नेत्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स त्यांच्या मतदारसंघात झळकली आहेत. वक्कलिंग समाजाचे धर्मगुरू डी. के. शिवकुमार यांना भेटले आहेत.
इतकेच नाही तर डार्क हॉर्स म्हणून दस्तूर खुद्द काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचेही नाव मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आहे. आत्तापर्यंत खर्गे यांच्या मुख्यमंत्री होण्याचा चान्स तीन वेळा आला होता. आता ते स्वतःच काँग्रेस अध्यक्ष असल्याने कदाचित स्वतःच्याच पारड्यात स्वतःचे मत टाकू शकतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण काँग्रेस मधील अंतर्गत सूत्रानुसार खर्गे हे मुख्यमंत्री बनणार नाहीत, तर ते मुख्यमंत्री बनवतील अशा पोझिशनला असल्याने त्यांचा मुख्यमंत्री पदाचा पत्ता कायमचा कट झाला आहे.
अशा स्थितीत काँग्रेसमध्ये सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे दोन प्रबळ तर बी. एम. पाटील आणि जी. परमेश्वरन हे तुलनेने कमी शक्ती असलेले मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. अर्थात ज्या नेत्याच्या नावाला काँग्रेस हायकमांड पाठिंबा देईल त्याचे पारडे त्याच्या वैयक्तिक शक्ती पेक्षा त्या पाठिंब्याच्या आधारेच जड बनेल यात शंका नाही.
Karnataka will be the Chief Minister on the wish of the High Command
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींची मोहब्बत की दुकान शुरू; याचा अर्थ हिजाबला अच्छे दिन, पीएफआय कारवाया पर्दानशीन!!
- केरळमध्ये NCB आणि नौदलाची मोठी कारवाई; तब्बल १२ हजार कोटींचे २५०० किलो ड्रग्ज जप्त!
- कर्नाटकात जेडीएस, महाराष्ट्रात राष्ट्रवादी; काँग्रेससाठी दोन्ही पक्ष “राजकीय गिऱ्हाईक”!!
- उत्तर प्रदेशात स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय होऊनही विरोधकांचा ईव्हीएम विरोधात आरडाओरडा का नाही??; “रहस्य” काय??