वृत्तसंस्था
बंगळुरू : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे कुटुंबीय मोठ्या सेक्स स्कँडलच्या आरोपांत घेरले गेले आहेत. देवेगौडा यांचे आमदार चिरंजीव एच. डी. रेवण्णा (६७) आणि खासदार नातू प्रज्वल रेवण्णा (३३) यांच्याविरुद्ध त्यांच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा एफआयआर हासन जिल्ह्यातील होलेनरासीपूर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे, तर प्रज्वल यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकात राजकीय भूकंप आला आहे. कर्नाटक महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी हे राज्यातील सर्वात मोठे सेक्स स्कँडल असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, ‘पेन ड्राइव्हमध्ये लैंगिक शोषणाशी संबंधित शेकडो पीडितांचे व्हिडिओ असल्याचे मला सांगण्यात आले आहे. यामध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला, पक्षाच्या कार्यकर्त्या आणि इतर महिलांचा समावेश आहे.’ यादरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महिला आयोगाच्या शिफारशीवरून प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहायक पोलिस महानिरीक्षक बी. के. सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली आहे.Karnataka sex scandal stirs excitement; Crime against Deve Gowda’s son and grandson, hundreds of videos found
नागलक्ष्मी यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यापासून हासन जिल्ह्यात मोठ्या संख्येने व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. महिलांसाठी काम करणाऱ्या कर्नाटक राज्य महिला दुर्जनय विरोधी ओकुट्टासह तीन संघटना २५ एप्रिल रोजी माझ्याकडे तक्रारी घेऊन आल्या आहेत. मला सांगण्यात आले की, व्हायरल झालेले व्हिडिओ अत्यंत हिंसक आणि आक्षेपार्ह आहेत. या व्हिडिओमध्ये महिला आपली सुटका करण्याची विनंती करत आहेत आणि खासदार प्रज्वल स्वत: व्हिडिओ शूट करत आहेत. हे व्हिडिओ इतके आक्षेपार्ह आहेत की, मी ते पाहू शकले नाही, त्याबद्दल काही सांगूही शकत नाही. मी याची माहिती त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. नागलक्ष्मी यांनी सांगितले की, एका पीडितेने मला आपबीती सांगितली. त्यांच्या (रेवण्णा) घरी काम करणे कठीण झाले होते, असा तिचा आरोप होता. आता तिने काम सोडले आहे. मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला सुरक्षेची चिंता आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडितांची गोपनीयताही धोक्यात आली होती. म्हणून आम्ही तातडीने कारवाईचा निर्णय घेतला. मी मुख्यमंत्री व डीजीपी यांना चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याबाबत पत्र पाठवले होते. आयोग केवळ शिफारस करू शकतो. हे व्हिडिओ किती जुने आहेत असे विचारले असता नागलक्ष्मी म्हणाल्या, एसआयटी चौकशी करेल तेव्हा स्पष्ट होईल. हे व्हिडिओ जवळपास ३-४ वर्षांत तयार करण्यात आल्याचे मला सांगण्यात आले.
प्रज्वल यांनी गेल्या वर्षी केली होती तक्रार
जेडीएसचे खासदार प्रज्वल यांनी गेल्या वर्षी नवीन गौडा यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी आपले बनावट आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर न्यायालयाने ८९ मीडिया आउटलेट्सवर प्रज्वलविरोधात आक्षेपार्ह कंटेंट प्रकाशित करण्यास बंदी घातली होती.
प्रज्वल मतदानानंतर गेले परदेशात
एका माध्यमातील वृत्तानुसार, २६ एप्रिलला हासन लोकसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर प्रज्वल परदेशात गेले. हासनचे सध्याचे खासदार प्रज्वल यंदा जेडीएसच्या तिकिटावर हासनचे उमेदवार आहेत. देवगौडांच्या नेतृत्वातील जेडीएस एनडीएत आहे. यापूर्वी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रज्वल यांच्या निवडणूक एजंटाने बनावट व्हिडिओ असण्याची तक्रार केली होती. दरम्यान, प्रज्वलचे काका व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, आम्ही चौकशी पूर्ण होण्याची प्रतीक्षा करू. कुणी कायद्याच्या दृष्टीने गुन्हा केला असेल तर त्याला वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
पीडितेची तक्रार- माझ्या जीविताला धोका
रेवण्णा, प्रज्वलविरुद्ध तक्रार करणारी महिला म्हणाली, मी रेवण्णाच्या पत्नीची नातेवाईक आहे. घरकाम करण्याच्या चार महिन्यांतच प्रज्वलचे वडील रेवण्णाने मला त्रास देणे सुरू केले. पत्नी जेव्हा बाहेर जायची तेव्हा रेवण्णा कोणत्या ना कोणत्या बहाण्याने मला खोलीत बोलवायचा व चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. प्रज्वलची इतकी दहशत होती की, तो येताच आम्ही स्टोअरमध्ये लपून बसत होतो. प्रज्वल माझ्या मुलीला व्हिडिओ कॉल करून अश्लील बोलत होता. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून कलम ३५४अ, ३५४ड, ५०६, ५०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. महिलेने आपल्या व कुटुंबीयांच्या जीविताला धोका असल्याचे सांगितले. रेवण्णा, प्रज्वलवर २०१९ ते २०२२ पर्यंत लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.
Karnataka sex scandal stirs excitement; Crime against Deve Gowda’s son and grandson, hundreds of videos found
महत्वाच्या बातम्या
- अल्पसंख्यांकांच्या हक्कावरून लोकसभेची निवडणूक कंडोम वापरावर आली, 1977 च्या निवडणुकीची आठवण झाली!!
- पवारांच्या माढा मोहिमेनंतर फडणवीसांची स्वारी; फेरमांडणी करून “मोदी है तो मुमकिन है” ची कसून पूर्वतयारी!!
- हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या मार्क-2 क्षेपणास्त्राचा संरक्षण ताफ्यात समावेश
- कुकी दहशतवद्यांना मणिपूरमध्ये CRPF कॅम्पला केले लक्ष्य ; बॉम्ब फेकले, दोन जवान शहीद