एसआयटीने त्याला रात्री उशिरा अटक केली. Karnataka sex scandal Prajwal Revanna appears in court today after medical examination
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : जेडीएसचे निलंबित खासदार प्रज्वल रेवन्नाला गुरुवारी रात्री उशीरा एसआयटीने बंगळुरू विमानतळावरून अटक केली. कर्नाटक सेक्स स्कँडल उघडकीस आल्यानंतर रेवन्ना जर्मनीला पळून गेला होता. गुरुवारी रात्री उशीरा तो बंगळुरू विमानतळावर पोहोचला.
एसआयटीने त्याला ताब्यात घेतले. आज त्याची वैद्यकीय तपासणी होणार असल्याचे समजते. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर रेवन्नाला बंगळुरू येथील सीआयडी कार्यालयात आणण्यात आले.
जेडी(एस) खासदार रेवन्नाच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेच्या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध लैंगिक छळ आणि गुन्हेगारी धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तो देश सोडून राजकीय पासपोर्टवर जर्मनीला गेला होता. त्यानंतर जवळपास महिनाभरानंतर तो बर्लिनहून भारतात परतला. बंगळुरू विमानतळावर पोहोचल्यानंतर कर्नाटक सरकारच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) रेवण्णाला ताब्यात घेतले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणी रेवण्णाला आज कोर्टात हजर केले जाणार आहे.
एसआयटीच्या पथकाने विमानतळावरून त्याच्या दोन बॅग जप्त केल्या आणि त्या वेगळ्या कारमध्ये नेल्या. रेवण्णाच्या आगमनापूर्वी, बंगळुरूमधील सीआयडी कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली होती आणि कार्यालयाबाहेर बॅरिकेड्स उभारण्यात आले होते. रेवन्ना त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेच्या तक्रारीनंतर लैंगिक छळ आणि गुन्हेगारी धमकीच्या आरोपाखाली एसआयटी तपासाला सामोरे जात आहे.
Karnataka sex scandal Prajwal Revanna appears in court today after medical examination
महत्वाच्या बातम्या
- नाशिकमध्ये गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते गंगा गोदावरी महाआरती; सुश्राव्य वाणीच्या रामकथेने भाविक मंत्रमुग्ध!!
- नाशिकमध्ये गोविंद देवगिरीजी महाराजांचा आज पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार प्रदान सोहळा!!
- पॉर्न स्टार खटल्यात सर्व 34 आरोपांमध्ये ट्रम्प दोषी आढळले; 11 जुलै रोजी शिक्षेची सुनावणी