विशेष प्रतिनिधी
बंगलोर : कर्नाटक आरोग्यमंत्री डॉक्टर के सुधाकर यांनी वर्ल्ड मेंटल हेल्थ डे निमित्ताने NIMHANS येथे सदर विधान केले आहे.
कर्नाटक आरोग्य मंत्री के सुधाकर रविवारी म्हणाले की, “भारतातील आधुनिक महिला या एकटे राहणे पसंत करतात तसेच लग्नानंतर मुलांना जन्म देण्यापेक्षा सरोगसिने जन्म देऊ इच्छितात. वृत्तसंस्था पीटीआयने हे वृत्त दिले आहे. ते पुढे म्हणाले की, “भारतीय समाजावर पाश्चिमात्य यांचा प्रभाव दिसत असून हल्ली आपल्या आई-वडिलांना सांभाळण्यास लोक तयार नसतात.”
Karnataka Health Minister, Dr. K Sudhakar on world mental health day
वर्ल्ड मेंटल हेल्थ डे च्या निमित्ताने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोलॉजिकल सायन्सेस येथे बोलताना ते म्हणाले की, “मला हे बोलताना दुःख होत आहे की तिकडे बऱ्याच महिला एकट्या राहू इच्छितात आणि जरी लग्न केले तरी मुलांना जन्म देऊ इच्छित नाहीत. सरोगसी सारखी माध्यमे ते वापरू इच्छितात. हा विचारातील फार मोठा बदल आहे आणि तो चांगला नाही.”
Measures to prevent violence against healthcare workers
ते पुढे म्हणाले, “दुर्दैवाने आपण पाश्चिमात्यांचे अनुकरण करू लागलो आहोत आणि आजी आजोबा तर दूरच पण आपल्या आईवडिलांना पण आपल्याजवळ ठेवू इच्छित नाही.” मानसिक आरोग्य विषयी बोलताना म्हणाले की, प्रत्येक सातवा भारतीय कोणत्या न कोणत्या मानसिक त्रासाने ग्रस्त आहे. ते म्हणाले की स्ट्रेस मॅनेजमेंट ही एक कला असून आपल्या पूर्वजांनी योगा आणि ध्यान शिकवले आहे. त्याचा भारतीयांनी अवलंब केला पाहिजे. आपण जगाला ताण व्यवस्थापन शिकवले पाहिजे. कारण योग, ध्यान व प्राणायाम हा आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी शिकविला आहे.”
सुधाकर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचे कर्नाटकला सप्टेंबरपासून १५ कोटी कोरोना लस पुरवल्याबद्दल आभार मानले आहेत. यामुळे राज्यातील लसीकरण व्याप्ती वाढली आहे. मंत्री पुढे म्हणाले की, “केंद्राने देखील लसीकरणाचे काम हातात घेतल्यापासून ९४ कोटी लस पुरवल्या आहेत. लसीकरण मोफत करण्यात आले आहे. भारत हा पहिलाच देश आहे जो लस मोफत पुरवत आहे. इतर ठिकाणी लोकांना १५०० ते ४००० रुपये एका डोसमागे द्यावे लागत आहेत.”
Karnataka Health Minister, Dr. K Sudhakar on world mental health day
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तराखंड निवडणूक 2022 : उत्तराखंडमध्ये भाजपला मोठा धक्का, 6 वेळा आमदार आणि परिवहन मंत्री यशपाल आर्य मुलासह काँग्रेसमध्ये सामील
- ड्रग्स प्रकरण : आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला, जामीन अर्जावरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब
- महाराष्ट्र बंद : मुंबईत दिसला बंदचा परिणाम, दगडफेकीच्या घटनेनंतर बेस्ट बस सेवा खंडित
- जम्मू -काश्मीरच्या पूंछमध्ये चकमकीत लष्कराचे 5 जवान शहीद, चार दहशतवादी लपल्याची शक्यता
- अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचे छापे; देशमुख मात्र कुटुंबीयांसह गायब??
- धर्म आणि कुटुंब व्यवस्थेविषयी मूल्यशिक्षण देऊन हिंदूंनी स्वतःचे धर्मांतर रोखले पाहिजे; मोहन भागवत यांचे परखड मत