विशेष प्रतिनिधी
बंगळूर : कर्नाटकमधील हावेरी जिल्ह्यात १६ वर्षांखालील मुलांची आरोग्य तपासणी मोहीम सुरु झाली आहे. ही मोहीम राबविणारा हा देशातील पहिला जिल्हा ठरला जात आहे. Karnataka Govt. will check health of children
मुलांच्या लसीकरणाचा निर्णय अद्याप झाला नसल्यामुळे त्यांची आरोग्य तपासणी करणे आणि कुपोषणापासून त्यांना वाचविणे महत्त्वाचे बनले आहे. या मोहिमेतून मुलांची माहिती संकलित केली जाईल. आजारी किंवा प्रकृतीच्या तक्रारी असलेल्या मुलांवर पुढील चार ते पाच महिने लक्ष ठेवले जाईल.
यात सुमारे पावणे तीन लाख मुलांची तपासणी केली जाईल. शिक्षक आणि पालकांचीही तपासणी आणि लसीकरण केले जाईल. बालरोगतज्ज्ञ तपासणी करीत असून गरजू मुलांना आवश्यक औषधे आणि पौष्टिक गोळ्यांचा संच दिला जाईल.
राज्याचे आरोग्यमंत्री बसवराज बोम्मई हे जिल्ह्यातील शिग्गावचे आमदार आहेत. ते पालक मंत्रीही आहेत. राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीने सरकारला दिलेल्या अहवालानुसार मोहीम सुरु करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी सरस पूर्वतयारी होईल. असे बोम्मई यांनी सांगितले.
Karnataka Govt. will check health of children
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात निवडणुका स्वबळावर लढण्याची बुवा – भतीजाची घोषणा
- जॉर्डनमध्ये सापडले ११ हजार वर्षापूर्वीचे जगातील पहिले धान्य कोठार
- करोनावरील सध्याची लस डेल्टा प्लसलाही भारी पडणार
- अखेर जॉन्सन अँड जॉन्सनने भरले २३ कोटी डॉलर्स आणि सोडवून घेतली मान
- मैत्रिणींबरोबर पार्टी करणाऱ्या तरुणीला बाटलीभर दारुसाठी ६१ हजारांचा गंडा