प्रतिनिधी
बेंगलोर : कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादी विचारांना तिलांजली देत आहे. कर्नाटक मधल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी विचारसरणीचा साधा अभ्यास देखील करू नये यासाठी काँग्रेस सरकारने चंग बांधला आहे. त्यामुळेच सिद्धरामय्या यांच्या सरकारने कर्नाटक मधल्या अभ्यासक्रमांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे धडे वगळले आहेत.Karnataka Government’s Tail Bends; Savarkar’s curriculum too
काँग्रेसला तसेही सावरकरांचे वावडेच आहे. सावरकरांनी मांडलेला राष्ट्रवादी विचार काँग्रेसच्या पचनी पडत नाही. पण त्यांचे जाज्वल्य क्रांतिकारकत्वही काँग्रेसला सहन होत नाही. त्यामुळे सिद्धरामय्या सरकारने अभ्यासक्रमामधला सावरकरांचा धडा वगळून त्या जागी धर्मनिरपेक्ष जवाहरलाल नेहरूंचा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास करण्यास मंजुरी दिली आहे.
काँग्रेसचे सरकार आल्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रम आधुनिकीकरणाच्या नावाखाली राष्ट्रवादी विचारांच्या नेत्यांच्या जीवनचरित्रांना अभ्यासक्रमातून तिलांजली देण्यात आली आहे. इतकेच नाही तर आधुनिक शिक्षण देण्याच्या बाता करणाऱ्या काँग्रेस सरकारने महाविद्यालयांमध्ये हिजाबला परवानगी देण्याचाही विचार केला आहे
Karnataka Government’s Tail Bends; Savarkar’s curriculum too
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र शासन, NSE आणि ‘मनी बी’ यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार
- UCC : समान नागरी कायद्याची दीर्घ प्रतिक्षा संपण्याच्या बेतात; कायदे आयोगाने नागरिक, धार्मिक संघटनांकडून मागविल्या सूचना
- तामिळनाडूत तपासासाठी आता CBIला घ्यावी लागणार परवानगी
- विरोधकांचे होईना ऐक्य, तरी लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांचे नितीश कुमार यांचे भाकीत!!