विशेष प्रतिनिधी
कर्नाटक : स्वातंत्र्योत्तर काळात कर्नाटक राज्याची स्थापना झाल्यानंतर कर्नाटकातील काही भाग हा ‘मुंबई कर्नाटक’ या नावाने ओळखला जायचा. त्याचे नामांतर करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. स्वातंत्र पूर्वीच्या काळात संस्थानांचा भाग वगळता प्रशासकीय सोयीकरता आणि राज्य कारभारा करिता इंग्रजांनी प्रांताची निर्मिती केली होती. या मधूनच बॉम्बे, बंगाल, मद्रास, पंजाब असे प्रांत उदयास आले होते. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1956 नंतर भाषेवर आधारित विविध राज्यांची निर्मिती देशामध्ये करण्यात आली होती.
Karnataka government’s decision! Mumbai Karnataka renamed as Kittur Karnataka
कन्नड भाषिकांनी म्हैसूर राज्याची निर्मिती केली आणि 1973 ला या राज्याचे नामकरण कर्नाटक असे करण्यात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बेळगाव, कारवार, धारवाड आणि विजापूर हे भाग मुंबई प्रांतामध्ये होते. पण जेव्हा कर्नाटक राज्याची निर्मिती झाली, त्यानंतर त्यांची ओळख आजही ‘मुंबई कर्नाटक’ अशीच कायम होती. त्यामुळे ही ओळख पुसण्यासाठी कर्नाटक सरकारने मुंबई कर्नाटक भागाचे नामांतर करून ‘कित्तूर कर्नाटक’ असे केले आहे.
नामांतर करण्याबाबतची संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्नाटक सरकारने ही घोषणा आज केली आहे. याआधी ‘हैदराबाद कर्नाटक’ प्रांताचे नामकरण करून ‘कल्याणा कर्नाटक’ असे करण्यात आले होते. एएनआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंबंधीची माहिती दिली आहे.
Karnataka government’s decision! Mumbai Karnataka renamed as Kittur Karnataka
महत्त्वाच्या बातम्या
-
- ब्रिटनमध्ये प्रथमच महात्मा गांधीजींचे चित्र असलेले नाणे प्रसिद्ध
- प. बंगालमध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्याची भाजपची तृणमूल काँग्रेसकडे मागणी
- रशियाचे तब्बल ९० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर, तणाव वाढला
- अमिताभ बच्चन यांच्या घरातील पेंटिंगची चर्चा
- भारताची भूमी बळकाविण्यासाठी चीनच्या सातत्याने व्यूहात्मक खेळी – अमेरिकेचा अहवाल