वृत्तसंस्था
विजयपूर : कर्नाटक विधानसभा निवडणुका जवळ येत असताना काँग्रेसचा सावरकर द्वेष पुन्हा उफाळला असून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी परत एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. केंद्रातल्या आणि कर्नाटकातल्या भाजप सरकारवर टीकास्त्र सोडताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे.Karnataka ex CM Siddaramaiah again targets savarkar and BJP, basawraj bommai reacts sharply
विजयपूर मध्ये पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, की भाजपने राणी चन्नम्मा कित्तूरचा कधी सन्मान केला नाही. राणी चन्नम्मा ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध त्वेषाने लढली होती. पण भाजप राणीचा सन्मान करण्यापेक्षा महात्मा गांधींना मारणाऱ्या गोडसेची पूजा करतो आणि ब्रिटिशांची माफी मागणाऱ्या सावरकरांना आदर्श मानतो. सावरकरांच्या विचारातूनच भाजप समाजात हिंदू – मुसलमानांमध्ये द्वेष पसरवतो. मी स्वतः हिंदू धर्म विरोधी नाही. पण सावरकरांनी आणि भाजपने स्वीकारलेल्या हिंदुत्वाच्या विरोधात आहे, असे वक्तव्य सिद्धरामय्या यांनी केले आहे.
सिद्धरामय्या यांच्या या वक्तव्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज मुंबई यांनी तितकेच तिखट प्रत्युत्तर दिले असून सिद्धरामय्या यांचा काँग्रेस पक्ष नेहमीच देशातल्या स्वातंत्र्यवीरांचा अपमान करत असतो. त्यांच्यात भेदभाव निर्माण करतो. हिंदू – मुसलमान भेदभाव करूनच त्यांनी देशाच्या फाळणीला मान्यता दिली, असे टीकास्त्र बोम्मई यांनी सोडले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुका जवळ येताना काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमधला वाद सामाजिक आणि राजकीय पातळीवर उफाळला असताना तो पुन्हा सावरकरांच्या मुद्द्यावर येऊन ठेपला आहे.
Karnataka ex CM Siddaramaiah again targets savarkar and BJP, basawraj bommai reacts sharply
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदी आज बंगळुरूत करणार एअरो इंडिया शोचे उद्घाटन : सुपरसॉनिक विमानांचे दिसेल थरारक उड्डाण
- दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचे उद्घाटन : मोदी म्हणाले- सीमेवर रस्ता बांधायला घाबरायची काँग्रेस, त्यांना सैनिकांच्या शौर्यावर संशय होता
- बिग बॉस 16चा किताब पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनला : शिव ठाकरे रनरअप, सलमानसाठी प्रियांका चौधरी राहिली खरी विनर
- पैसा नाही कमी पडणार!; बंजारा समाजासाठी शिंदे – फडणवीस सरकारचा 593 कोटींचा विकास आराखडा!!