• Download App
    Karnataka Election 2023 : ''संजय राऊतांनी जर काँग्रेसची दलाली सोडली, तर मी...'' देवेंद्र फडणवीसांनी साधला निशाणा! Karnataka Election 2023 If Sanjay Raut leaves Congress I will not come here  Devendra Fadnavis

    Karnataka Election 2023 : ”संजय राऊतांनी जर काँग्रेसची दलाली सोडली, तर मी…” देवेंद्र फडणवीसांनी साधला निशाणा!

    जाणून घ्या, कर्नाटकात प्रसारमाध्यमांशी बोलताना  देवेंद्र फडणवीस  नेमकं काय म्हणाले?

    विशेष प्रतिनिधी

    बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणूकीस अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत आणि सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. आरोप-प्रत्यारोप जोरदार सुरू आहेत. दरम्यान आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मराठी भाषिकांच्या पाठीशी भाजपा असल्याचे सांगितले तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवरही निशाणा साधला.  Karnataka Election 2023 If Sanjay Raut leaves Congress I will not come here  Devendra Fadnavis

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘’भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रीय पक्ष आहे. यापूर्वीही लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी इथे आलो होतो. परंपरेचा जर विचार केला तर विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना काँग्रेसचे इन्चार्ज होते आणि संपूर्ण कर्नाटकमध्ये, सगळीकडे ते फिरत होते. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. मराठी भाषिकांच्या मागे मी पण आहे आणि भारतीय जनता पार्टी देखील आहे. म्हणूनच ‘मराठा बोर्ड’ हा भारतीय जनता पार्टीने तयार केला आहे.’’

    याचबरोबर तुम्हाला काळे झेंडे दाखवण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीने दिलाय, यावर  फडणवीसांनी ‘’संजय राऊतांनी जर काँग्रेसची दलाली सोडली, तर मी इथे येणार नाही. ते काँग्रेसची दलाली करण्यासाठी इथे येत आहेत. आम्हाला सांगण्यापेक्षा, संजय राऊतांचा मित्र पक्ष काँग्रेस आहे. त्यांनी काँग्रेसला सांगायला पाहिजे होतं की तुम्ही इथे उमेदवार उभे करू नका. तुम्ही त्यांच्या नेत्यांना प्रचाराला आणू नका. ते असं बोलत नाहीत, कारण काँग्रेसच्या सांगण्यावर आमची मतं कमी करण्याकरता काँग्रेसची दलाली करण्यासाठी संजय राऊत या ठिकाणी आले आहेत.’’ अशा शब्दांत राऊतांना टोला लगावला.

    Karnataka Election 2023 If Sanjay Raut leaves Congress I will not come here  Devendra Fadnavis

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pakistan earthquake : भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात आधीच रेडिएशनची भीती, त्यात दोन दिवसांनंतर आज तिसऱ्या भूकंपाचा धक्का!!

    Rajnath Singh : राजनाथ म्हणाले- रावळपिंडीपर्यंत ब्राह्मोसचा आवाज गेला; ते आपल्या सैन्याच्या ताकदीचे प्रतीक

    Operation Sindoor मधून भारताचा नूर खान + किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का, पाकिस्तानात रेडिएशनचा धोका, अमेरिकेसकट चीनला हादरा!!