कर्नाटकात समान नागरी कायदा लागू करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : भारतीय जनता पार्टीने कर्नाटक निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी पक्षाचे व्हिजन डॉक्युमेंट ‘प्रजा ध्वनी’ जारी केले. भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात कर्नाटकात समान नागरी कायदा लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. Karnataka Election 2023 BJP releases Manifesto for Karnataka
भाजपने आपल्या जाहीरनाम्यात 7 ‘A’ लक्षात ठेवले आहेत. यामध्ये Anna, Akshara, Aarogya, Abhivruddhi, Aadaya आणि Abhaya यांचा समावेश आहे. यासोबतच बीपीएल कार्डधारकांना तीन मोफत स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. तसेच प्रत्येक प्रभागात अटल आहार केंद्र सुरू करण्याचे आणि पोषण आहार योजनेंतर्गत प्रत्येक बीपीएल कार्डधारक कुटुंबाला अर्धा लिटर नंदिनी दूध देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
भाजपाने राज्यातील गरीबांना १० लाख घरे देण्याची घोषणाही केली आहे. त्याचवेळी, सामाजिक न्याय निधी योजनेअंतर्गत, एससी-एसटी महिलांना पाच वर्षांसाठी १० हजार रुपयांची एफडी देण्याचे वचन दिले आहे. यासोबतच भाजपाने कर्नाटक अपार्टमेंट ओनरशिप अॅक्ट, 1972 मध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी, कर्नाटक रहिवासी कल्याण सल्लागार समिती स्थापन केली जाईल, जी बेंगळुरूमधील अपार्टमेंट रहिवाशांचे जीवनमान सुधारेल.
जाहीरनाम्यावर मुख्यमंत्री बोम्मई काय म्हणाले?
जाहीरनामा प्रसिद्ध करताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, या जाहीरनाम्यात राज्याच्या विकासाचा विचार करण्यात आला आहे. आमचा एका मजबूत राज्यावर विश्वास आहे जे मजबूत केंद्राकडे घेऊन जाईल. हा जनतेचा जाहीरनामा आहे.
Karnataka Election 2023 BJP releases Manifesto for Karnataka
महत्वाच्या बातम्या
- ” उबाठाचा प्रवास ‘ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिस्टांकडे’ असल्याने भविष्यात…” आशिष शेलारांनी लगावला टोला!
- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत 317 तालुक्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रमाचा प्रारंभ
- LPG सिलिंडर आज 171.50 रुपयांनी झाला स्वस्त, जाणून घ्या दिल्ली ते चेन्नईचे नवे दर
- ऑनलाईन प्रेम प्रकरणाचा भयानक शेवट; ‘ISI’च्या षडयंत्रात अडकलेल्या विद्यार्थ्याला हेरगिरीच्या आरोपात जावे लागले तुरुंगात!