• Download App
    पक्षादेश येताच क्षणात मुख्यमंत्रीपदाचा त्याग ; येडीयुरप्पा|Karnataka CM Yediyurappa clear that he is ready to quit as CM the day central leadership wants him to

    पक्षादेश येताच क्षणात मुख्यमंत्रीपदाचा त्याग ; येडीयुरप्पा

    कर्नाटक कोरोना महामारीशी लढत असतानाच राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाशासीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. पहिल्यांदाच भाजपाच्या प्रदेश नेत्यांनीही या संदर्भातल्या घडामोडींना दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनीही खुर्चीचा मोह नसल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण होणार या चर्चेला उधाण आले आहे. Karnataka CM Yediyurappa clear that he is ready to quit as CM the day central leadership wants him to


    वृत्तसंस्था

    बंगळुरु : कर्नाटकचे 78 वर्षीय मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडीयुरप्पा यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल पहिल्यांदाच स्पष्ट आणि ठाम वक्तव्य केले आहे.

    चोवीस तासांपूर्वीच त्यांचा मुलगा बीवाय विजयेंद्र आणि भाजपाचे उपाध्यक्ष यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर येडीयुरप्पा यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व आले आहे.



    कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपद बदलाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. या संदर्भातले मौन येडीयुरप्पा यांनी पहिल्यांदाच तोडले. येडीयुरप्पा यांनी रविवारी (दि. 6) स्पष्ट केले की, पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्त्वाने आदेश दिल्याच्या दिवशीच मी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची रिकामी करेन.

    विशेष म्हणजे आदल्या दिवशीच भाजपाचे राष्ट्रीय महासचिव सीटी रवी यांनी म्हटले होते की, येडीयुरप्पा यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण केला पाहिजे.  “दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मुख्यमंत्री म्हणून मी काम करत राहीन. ज्या दिवशी ते मला सांगतील त्याच दिवशी मी बाजूला होईन आणि स्वतःला राज्याच्या हिताच्या अन्य कार्यात गुंतवून घेईन.

    माझी भूमिका स्पष्ट आहे. पक्षाने मला संधी दिली आहे आणि मी माझ्या सर्व शक्तीनिशी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे. बाकी सगळे काही केंद्रीय नेतृत्त्वावर अवलंबून आहे,”या शब्दात येडीयुरप्पा यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर स्वतःचे मनोगत मांडले. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाच तर पर्यायांचा अभाव ही समस्या नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    “देशातल्या कोणत्याही राज्यात पर्याय हे नेहमीच उपलब्ध असतात. कर्नाटकामध्ये पर्याय नाहीत यावर माझा विश्वास नाही. केंद्रीय नेतृत्त्वाचा विश्वास असेपर्यंत माझे मुख्यमंत्रीपद कायम राहील,” असे येडीयुरप्पा म्हणाले.

    सार्वजनिक जीवनात होणाऱ्या व्यक्तीगत हल्यांना प्रत्युत्तर देणार नसल्याचे ते म्हणाले. मंत्रीमंडळातील त्यांचे सहकारी सीपी योगेश्वरा आणि पक्षाच्या काही आमदारांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

    Karnataka CM Yediyurappa clear that he is ready to quit as CM the day central leadership wants him to

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित