वृत्तसंस्था
बेंगलोर : कर्नाटकात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याबरोबर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोग या आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करीत आहे. या आचारसंहितेतून दस्तुरखुद्द मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील सुटलेले नाहीत. आज पोलिसांनी भर रस्त्यात त्यांच्या कारची झडती घेतली. Karnataka CM Basavaraj Bommai’s car checked by the Flying Squad team of the Election Commission
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज दोड्डाबल्लारपूर मधील घाटी सुब्रमण्यम मंदिरात दर्शनाला गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा मंदिराकडे जात असतानाच रस्त्यावर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली आणि तिचा तपास केला. या तपासात पोलिसांना कारमध्ये काहीही आढळले नाही. त्यानंतर चेकअप करून पोलिसांनी मुख्यमंत्र्यांची गाडी सोडून दिली त्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बॉम्बे यांनी दोड्डाबल्लारपूर मध्ये जाऊन घाटी बालाजी मंदिरात दर्शन घेतले.
कर्नाटकात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर तेथे निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे आणि निवडणूक आयोगाने या आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केल्याचीच ही झलक दाखविली आहे.
याच कर्नाटकात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या रोड शो मध्ये त्यांच्या गाडीवर 500 रुपयांच्या नोटा उधळल्या होत्या. त्यावर मात्र निवडणूक आयोगाने अद्याप कारवाई केल्याची बातमी नाही.
Karnataka CM Basavaraj Bommai’s car checked by the Flying Squad team of the Election Commission
महत्वाच्या बातम्या
- अमेरिकेने रशियामध्ये राहणाऱ्या अमेरिकन लोकांना तत्काळ देश सोडण्याचे केले आवाहन
- अभिमानास्पद! पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात, भारत बनला जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार!
- पंतप्रधान मोदींची नवीन संसद भवनाला अचानक भेट, बांधकाम कामगारांशी केली चर्चा
- ‘मी फरार नाही, मी बंडखोर आहे… मी लवकरच समोर येईन’, अमृतपालने जारी केला नवा व्हिडिओ