• Download App
    भाजपचे सर्व पोपट सतत टिवटिव करत असतात. ते आता गप्प का आहेत? कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा ; शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत | Karnataka Chief Minister Basavaraj Bommai should resign immediately; Shiv Sena MP Arvind Sawant

    भाजपचे सर्व पोपट सतत टिवटिव करत असतात. ते आता गप्प का आहेत? कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा ; शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बंगळूर येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. या घटनेविरूद्ध महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी एबीपी माझ्यासोबत बोलताना भाजपाविरोधी आपला असंतोष व्यक्त केला आहे.

    Karnataka Chief Minister Basavaraj Bommai should resign immediately; Shiv Sena MP Arvind Sawant

    ते म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे फक्त स्वप्न दाखवले नव्हते तर ते साकारही केले हाेते. भाजप सरकारच्या काळामध्ये, भाजप सरकारच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांचा अपमान केला जातोय. तर या देशाचे पंतप्रधान गप्प का आहेत? असा प्रश्न त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

    पुढे ते म्हणतात की, आमच्यामध्ये राग आहे. तो आम्ही अतिशय संयमपूर्ण पध्दतीने व्यक्त करत आहोत. भाजपचे सर्व पोपट सतत टिवटिव करत असतात. ते आता गप्प का आहेत? यातूनच त्यांचे ढोंगी स्वरूप लक्षात येण्यासारखे आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली आहे.


    छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात नेणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन


    कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबना बाबत बोलताना म्हटले होते की, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही अतिशय क्षुल्लक गोष्ट आहे. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावरदेखील टीकेची झोड उठली आहे.

    यादरम्यान ठिकठिकाणी बरीच आंदोलने सुरू आहेत. आज पहाटेपासूनच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करण्यास सुरूवात केलेली आहे. पोलिसांनी महाराष्ट्राचे एकीकरण समितीचे प्रमुख नेते माजी महापौर सरिता पाटील यांच्यासह 34 जणांना अटक केली आहे.

    Karnataka Chief Minister Basavaraj Bommai should resign immediately; Shiv Sena MP Arvind Sawant

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली