महापालिकेत सत्तेत येण्याचे काँग्रेसचे स्वप्न भंगले
विशेष प्रतिनिधी
हुबळी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 2023 मध्ये अपयश आलेल्या भाजपासाठी मंगळवार हा आनंदाची बातमी देणारा दिवस होता. हुबळी-धारवाड महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली असून भाजपाने सलग दुसऱ्यांदा दोन्ही पदं पटकावून जिल्ह्याचा कारभार आपल्या ताब्यात कायम ठेवला आहे. Karnataka BJP wins the post of Mayor and Deputy Mayor of Hubli Dharwad Municipality
मंगळवारी पार पडलेल्या कर्नाटकातील हुबळी-धारवाडच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या वीणा भारदवाड यांची महापौरपदी तर सतीश हंगल यांची उपमहापौरपदी निवड झाली आणि महापालिकेत सत्तेत येण्याचे काँग्रेसचे स्वप्न अखेर भंगले.
माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, मंत्री सतीश जारकीहोळी आणि संतोष लाड यांनी या महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी रणनीती आखली होती, मात्र त्यांची रणनीती फसली. भाजपाच्या विजयामुळे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या कामात मोठा पेच निर्माण झाला आहे.
Karnataka BJP wins the post of Mayor and Deputy Mayor of Hubli Dharwad Municipality
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांची पॉप्युलरिटी, भाजपची सलग तिसऱ्यांदा शंभरी, ही तर पवारांची राजकीय कंबख्ती!!
- Maharashtra Drone Mission : देशातील पहिले ड्रोन धोरण आणि इकोसिस्टम महाराष्ट्राने तयार करावे – फडणवीस
- इतरांना गद्दार म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंचीच खरी गद्दारी; देवेंद्र फडणवीसांचे शरसंधान
- तीच कॅसेट वाचवू नका, निदान स्क्रिप्ट रायटर तरी बदला; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला