• Download App
    Karnataka : भाजप खासदार तेजस्वी सूर्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण...|Karnataka BJP MP Tejashwi Surya meets Deputy Chief Minister DK Shivakumar

    Karnataka : भाजप खासदार तेजस्वी सूर्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…

    • कर्नाटकात ‘खेला’ होणार आहे, असे काही लोकांचे म्हणणे आहे.

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये भाजप खासदार तेजस्वी सूर्या आणि डीके शिवकुमार यांच्या भेटीने खळबळ उडाली आहे. या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज लावत आहेत. कर्नाटकात ‘खेला’ होणार आहे, असे काही लोकांचे म्हणणे आहे.Karnataka BJP MP Tejashwi Surya meets Deputy Chief Minister DK Shivakumar

    खरं तर, या वर्षी कर्नाटकात विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हा काँग्रेसने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद दिले. मात्र, या निर्णयामुळे डीके शिवकुमार हे कुठंतरी नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिवाय ते लवकरच कर्नाटकचे मुख्यमंत्री होतील अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.



    मध्यंतरी कुमारस्वामी यांनीही डी के शिवकुमार मुख्यमंत्री होणार असतील, तर आमचा त्यांना पाठींबा असेल असं म्हणून काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडवून दिली होती. त्यात आता भाजपा खासदार तेजस्वी सूर्या आणि डी के शिवकुमार यांची भेट झाल्याने चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.

    सोशल मीडियावर लोक या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, “प्रकरण मिटले आहे. शिवकुमार लोकसभेनंतर मुख्यमंत्री होत आहेत. सूर्याभाई मोटा भाईंचा मेसेज घेऊन गेले होते.” तर दुसऱ्याने लिहिले की, कर्नाटकातील सरकार पडणार असल्याचे दिसते. आणखी एका यूजरने लिहिले की, “सिद्धरामय्या यांचा काळ संपत आला आहे आणि कर्नाटकात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे.”

    Karnataka BJP MP Tejashwi Surya meets Deputy Chief Minister DK Shivakumar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत