जाणून घ्या निवडणुकीचा निकाल कधी असणार?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. Karnataka Assembly Election Schedule Announcement Voting on 10 May
१० मे रोजी कर्नाटकमध्ये विधानसभेसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. तर १३ मे रोजी मतमोजणी आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना २० एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. विधानसभेच्या एकूण २२४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी एकूण ५ कोटी १ लाख मतदान प्रक्रियेत सहभागी होतील, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
याशिवाय, १ एप्रिल रोजी १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. या निवडणुकीत ९ लाख १७ हजार नवमतदार मतदान करणार आहेत. एकूण मतदान केंद्रांची संख्या ५८ हजार २८२ तर प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ८८३ मतदार मतदान करतील.
Karnataka Assembly Election Schedule Announcement Voting on 10 May
महत्वाच्या बातम्या
- डोकलाम मुद्द्यावरून भूतानने भारताला दिला धक्का, सीमावाद सोडवण्यात चीनला समान भागीदार म्हटले
- पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट, अनेक आयपीएस अधिकाऱ्यांना गंडा
- पालघरमधील साधू हत्याकांडावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, सीबीआयकडे तपास सोपवण्याची मागणी
- Hinduism : जगातील ६६ हून अधिक देश हिंदू धर्माला धर्म मानत नाहीत – परराष्ट्र राज्यमंत्री मिनाक्षी लेखी यांनी नोंदवला आक्षेप