• Download App
    कर्नाटकात 14 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर ; उद्यापासून लागू ; चार तास अत्यावश्यक सेवा|Karnataka announces 14-day lockdown;Applicable from tomorrow; Four hours of essential service

    कर्नाटकात १४ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर ; उद्यापासून लागू ; चार तास अत्यावश्यक सेवा

    वृत्तसंस्था

    बंगळुरू : कर्नाटकात 14 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सकाळी चार तास वगळता राज्यात सर्व बंद राहील, अशी घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडियूरप्पा यांनी आज केली.Karnataka announces 14-day lockdown;Applicable from tomorrow; Four hours of essential service

    राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून या संकटावर मात करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात 27 एप्रिल रात्री 9 वाजल्यापासून ते 10 मे पर्यंत हा लॉकडाऊन असेल.


    कर्नाटकात मुख्यमंत्री येडीयुरप्पांविरोधात खदखद; ग्रामविकासमंत्री ईश्वरप्पांचे राज्यपालांना पत्र; मुख्यमंत्री अधिकारशाही गाजवत आहेत!!


     

    दररोज सकाळी 6 ते 10 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. बस वाहतूक पूर्ण बंद राहणार आहे. मद्याची दुकाने पार्सल सेवेसाठी सुरू ठेवली आहे. 18 ते 45 वयोगटातील लोकांना कोरोनाची मोफत लस देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली .

    औद्योगिक क्षेत्रातील आस्थापने सुरु राहतील. कापड दुकाने बंद राहणार असून बांधकाम क्षेत्र मात्र सुरु ठेवले जाणार आहे.

    Karnataka announces 14-day lockdown;Applicable from tomorrow; Four hours of essential service

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड