विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतातल्या विशिष्ट बुद्धिमंत वर्गाच्या प्रतिनिधींच्या विविध राजकीय भाकितांना एकीकडे सुरुंग लागला असताना दुसरीकडे या विशिष्ट बुद्धिमत्ता वर्गाची जीभ घसरल्याची उदाहरणे समोर आली आहेत. यातलेच एक अत्यंत महत्त्वाचे उदाहरण म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर यांचे देता येईल. Karan Thapar’s explosive interview in which parakalaPrabhakar predicts the very results
पत्रकार करण थापर यांना “द वायर” वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेल साठी साठी दिलेल्या मुलाखतीत बोलताना परकला प्रभाकर यांची जीव घसरली. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे भाकीत करताना त्यांनी भाजपला 220 जागांपर्यंतच अडकून राहावे लागेल, असे सांगितले. पण त्यापुढे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भवितव्य हातकड्यांमध्ये अडकेल किंवा त्यांची राजकीय शवयात्रा निघेल, असे उद्गार परकला प्रभाकर यांनी काढले.
परकला प्रभाकर हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती असले तरी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक धोरणांचे कठोर टीकाकार मानले जातात. त्यांनी विविध पुस्तके लिहून मोदींच्या आर्थिक धोरणांवर शरसंधान साधले आहे. द वायरला दिलेल्या मुलाखतीत परकला प्रभाकर यांनी भाजपला लोकसभा निवडणुकीत 220 जागांच्या आसपास राहुल समाधान मानावे लागेल. त्यांच्या मित्र पक्षांना 40 ते 50 जागांच्या आसपास जागा मिळतील. त्यापलीकडे त्यांचा परफॉर्मन्स सुधारणार नाही, असा दावा केला. हिंदुत्वाचा मुद्दा किंवा राम मंदिराचा मुद्दा भाजपला फायदेशीर ठरण्याऐवजी तो मुद्दा आता त्यांच्यावरचे ओझे बनला असल्याचाही दावा परकला प्रभाकर यांनी केला.
पण त्यापलीकडे जाऊन करण थापर यांनी जर भाजपचा लोकसभा निवडणुकीत पराभवच होणार असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भवितव्य काय??, असा प्रश्न विचारला त्यावर बोलताना परकला प्रभाकर यांनी मोदींचे भवितव्य एकतर हातकड्यांमध्ये अडकेल किंवा त्यांची राजकीय शवयात्रा निघेल असे वक्तव्य केले. परकला प्रभाकर यांनी “Modi will end up in Handcuffed or in Coffin..”, असे उद्गार काढले.
दिल्लीच्या बुद्धिमंत राजकीय वर्तुळामध्ये मोदींना शिव्या देण्याची “प्रथा” आणि “परंपरा” नवीन नाही. परकला प्रभाकर यांचे मित्र आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींना “चहावाला” आणि “नीच आदमी” असे म्हटले होते. सोनिया गांधींनी मोदींना “मौत का सौदागर” ठरवून टाकले होते. त्यापाठोपाठ परकला प्रभाकर यांनी आता मोदींना हातकड्या घातल्या आणि त्यांची राजकीय शवयात्रा काढली!!
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी अत्यंत खूष होऊन परकला प्रभाकर यांची मुलाखत ट्विट केली. आपण जे मोदींविषयी भाकीत केले, तेच परकला प्रभाकर बोलले, असे शशी थरूर यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.