वृत्तसंस्था
नवी दिल्ली : चिंतन फळता फळेना, गळती थांबता थांबेना!!, अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. काँग्रेस पक्षाने उदयपूरमध्ये मोठे चिंतन शिबीर आयोजित केले खरे, पण त्या चिंतनाचा काहीही उपयोग झाला नाही. Kapil Sibal leaves Congress and goes to Rajya Sabha with the support of Samajwadi Party
उलट या चिंतन शिबिरात पासून नव्याने सुरू झालेली काँग्रेस मधली गळती कपिल सिब्बल यांच्या रूपाने देखील सुरूच राहिल्याचे दिसून आले आहे.
कपिल सिब्बल यांनी काँग्रेसचा हात सोडत समाजवादी पक्षाच्या साथीने राज्यसभेवर पोचण्याची तयारी केली आहे. कपिल सिब्बल यांनी अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत आज राज्यसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्ष सोडून बाहेर पडल्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींबाबत मी काही बोलणार नाही. राज्यसभेत मी स्वतंत्रपणे अनेक विषयांवर आवाज उठवेन. अखिलेश यादव, शिवपाल यादव आदी नेत्यांनी मला पाठिंबा देऊन सहकार्य केले आहे. त्यांचा मी आभारी आहे, असे वक्तव्य कपिल सिब्बल यांनी राज्यसभेचा अर्ज दाखल केल्यानंतर केले आहे.
कपिल सिब्बल हे जी 23 गटाचे प्रमुख नेते मानले जात होते. काँग्रेसमध्ये फक्त गांधी परिवाराचे नियंत्रण नको. पक्षात सामूहिक नेतृत्व विकसित केले पाहिजे, अशा मताचा आग्रह कपिल सिब्बल यांनी काँग्रेसमध्ये असताना धरला होता. परंतु आता ते काँग्रेस बाहेर पडल्याने त्यांच्या दृष्टीने हा विषय कायमचा मिटला आहे. आपल्या राजकीय कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जाण्याची तयारी केली दिसत आहे. त्यांच्या बरोबरच अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव समाजवादी पक्षाच्या उमेदवार म्हणून राज्यसभेत जाणार आहेत.
Kapil Sibal leaves Congress and goes to Rajya Sabha with the support of Samajwadi Party
महत्वाच्या बातम्या