विशेष प्रतिनिधी
चोपडा : पावसाळा आला की सातपुडा पर्वत रांगातील विविध रानभाज्यांच्या आगमन होण्यास सुरुवात होते. परंतु पावसाचे आगमन उशिराने झाल्याने सातपुडा पर्वत रांगातील सर्वांना हवेहवेसे वाटणारे कर्टुल या रानभाजीचे आगमन यावर्षी उशिराने झाले.कर्टुल या भाजीचे आयुर्वेदीक गुणधर्म असल्याने नागरिक आतुरतेने वाट पाहत असतात.kantola vegetable is good fo health
कंटोळी (कर्टुल) ही अशीच शरीरावर वेगाने चांगला परिणाम करणारी भाजी आहे. कंटोळीला सर्वात ताकदवान भाजी मानले जाते. अनेकदा औषधी स्वरूपातही वापरली जाते. कंटोळीचे काही दिवस सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त होण्यास मदत होते.
वजन कमी करते : कंटोळीत प्रोटीन, लोह भरपूर आणि कॅलरी कमी प्रमाणात असतात. १०० ग्रॅम कंटोळीच्या भाजीतून १७ कॅलरीज मिळतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी कंटोळी उत्तम पर्याय आहे.
पचनक्रिया सुधारण्यास उत्तम : कंटोळीची भाजी खायची नसल्यास त्याचं लोणचंही तयार करता येतं. आयुर्वेदात अनेक रोगांवर याचा औषध म्हणूनही उपयोग केला जातो. पचनक्रिया सुधारण्यासाठी कंटोळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
उच्च रक्तदाबावर रामबाण : कंटोळीत असणारे मोमोरडीसिन तत्व आणि फायबर शरीरासाठी रामबाण आहे. मोमोरडीसिन तत्व अॅन्टीऑक्सीडेंट, अॅन्टीडायबिटीज आणि अॅन्टीस्ट्रेसचे काम करते तसेच वजन आणि उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
अँटी अँलर्जींक गुण असतात : कंटोळीत अँटी अँलर्जन आणि एनाल्जेसिक सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. नेत्ररोग, हृदयरोग तसेच कर्करोगाच्या रूग्णांसाठीही कंटोळीचे सेवन फायदेशीर ठरते.
- कंटोळी (कार्टुल) रानभाजी असून औषधी आहे
- कंटोळी (कार्टुल) चवीला उत्तम ,भरपूर प्रोटीनयुक्त
- दररोज सेवन केल्याने शरीराला ताकद मिळते
- मांसापेक्षाही अधिक प्रोटीन असतात
- फायटोकेमिकल्स शरीर निरोगी बनवतात
- भाजीतील अॅन्टीऑक्सिडेंट रक्त शुद्ध करतात
- त्वचासंबंधी रोगांपासूनही बचाव होतो
- भाजी सेवनामुळे वजन कमी करते
- पचनक्रिया सुधारण्यास उत्तम
- उच्च रक्तदाबावर रामबाण
kantola vegetable is good fo healt