• Download App
    धक्कादायक! भावाच्या हत्येप्रकरणी कन्नड अभिनेत्री शनाया कटवेला अटक, रस्त्यावर सापडले मृतदेहाचे तुकडे।Kannada actress Shanaya Katve arrested in brother’s murder case, body parts found on road

    धक्कादायक! भावाच्या हत्येप्रकरणी कन्नड अभिनेत्री शनाया कटवेला अटक, रस्त्यावर सापडले मृतदेहाचे तुकडे

    शनायाने राकेश कटवे याला ठार मारले आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. या हत्येप्रकरणी आणखी चार जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. Kannada actress Shanaya Katve arrested in brother’s murder case, body parts found on road


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी आली आणि एकच खळबळ उडाली. आपल्या भावाच्या हत्येप्रकरणी कन्नड अभिनेत्री शनाया कटवेला हुबळी पोलिसांनी अटक केली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनायाने राकेश कटवे याला ठार मारले आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. या हत्येप्रकरणी आणखी चार जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.



    राकेश काटवेचे डोके देवरागुडीहलच्या जंगलात सापडले

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राकेश काटवेचे डोके देवरागुडीहलच्या जंगलात सापडले होते, तर मृतदेहाचे उर्वरित तुकडे हुबळी आणि गाडाग रोडवर सापडलेत. धारवाड जिल्हा पोलिसांनी नियाज अहमद कटिगार, तौसिफ चन्नापूर, अल्ताफ मुल्ला आणि अमन गिरानीवाले यांच्यासह आणखी चार संशयित आरोपींची ओळख पटवली .

    राकेशची 9 एप्रिल रोजी राहत्या घरात हत्या

    राकेशची 9 एप्रिल रोजी राहत्या घरात हत्या करण्यात आली. त्या काळात शनाया तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हुबळीला गेली होती. त्याचवेळी आरोपींनी राकेशला चाकूने ठार मारले. नियाज अहमद आणि बाकीच्या लोकांनी एक दिवसानंतर मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर शहरातील अनेक भागात ते फेकून दिले.

    शनायाला अटक

    त्यानंतर शनायाला तिच्या भावाच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

    Kannada actress Shanaya Katve arrested in brother’s murder case, body parts found on road

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!