• Download App
    कंगना रनौत पुन्हा अडचणीत, मानहानीच्या प्रकरणात नोटीस, भटिंडा कोर्टात हजर राहण्याचे आदेश । Kangana Ranaut in trouble again, notice in defamation case, order to appear in Bathinda court

    कंगना रनौत पुन्हा अडचणीत, मानहानीच्या प्रकरणात नोटीस, भटिंडा कोर्टात हजर राहण्याचे आदेश

    Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा अडचणीत आली आहे. मानहानीच्या प्रकरणात कंगनाला नोटीस बजावण्यात आली आहे. भटिंडा येथील न्यायालयाने कंगनाला १९ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. भटिंडा येथील बहादूरगढ जांदिया येथील महिंदर कौर या वयोवृद्ध महिलेवर आक्षेपार्ह कमेंट केल्यामुळे मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. वकिलाच्या म्हणण्यानुसार, कंगना रणौतला 19 एप्रिल रोजी भटिंडाच्या माननीय न्यायालयात हजर राहावे लागेल, जर ती हजर झाली नाही तर तिच्या अटकेचे वॉरंटही जारी केले जाऊ शकते. Kangana Ranaut in trouble again, notice in defamation case, order to appear in Bathinda court


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा अडचणीत आली आहे. मानहानीच्या प्रकरणात कंगनाला नोटीस बजावण्यात आली आहे. भटिंडा येथील न्यायालयाने कंगनाला १९ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. भटिंडा येथील बहादूरगढ जांदिया येथील महिंदर कौर या वयोवृद्ध महिलेवर आक्षेपार्ह कमेंट केल्यामुळे मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. वकिलाच्या म्हणण्यानुसार, कंगना रणौतला 19 एप्रिल रोजी भटिंडाच्या माननीय न्यायालयात हजर राहावे लागेल, जर ती हजर झाली नाही तर तिच्या अटकेचे वॉरंटही जारी केले जाऊ शकते.

    प्रतिष्ठा कमी केल्याचा आरोप

    कंगनाने या वृद्ध महिलेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनात 100 रुपयांसाठी सहभागी होऊन निषेध केल्याचा आरोप केला होता. या महिलेच्या वकिलाने सांगितले की, याप्रकरणी 4 जानेवारी 2021 रोजी खटला दाखल करण्यात आला होता. ज्याची सुनावणी सुमारे 13 महिने चालली. आता कोर्टाने कंगनाला समन्स बजावले आहे. ज्यामध्ये त्याला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    कौर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, कंगनाने एका ट्विटमध्ये आपल्यावर खोटे आरोप आणि टिप्पणी करत एका महिलेशी तुलना केली आहे. कंगनाने ट्विट करून म्हटलं होतं की, ही तीच आजी आहे जी शाहीन बागमध्ये CAA विरोधी आंदोलनात होती. असे वक्तव्य करून अभिनेत्रीने आपली प्रतिष्ठा कमी करण्याचे कृत्य केले आहे, असे त्यांनी म्हटले.

    काय म्हणाली होती कंगना?

    कंगनाने ट्विट करून म्हटले होते की, ही तीच आजी आहे, जिचे टाईम मासिकाने शक्तिशाली भारतीय म्हणून वर्णन केले होते. ही 100 रुपयांना उपलब्ध आहेत. पाकिस्तानी पत्रकारांनी भारताचा आंतरराष्ट्रीय जनसंपर्क लज्जास्पदपणे हायजॅक केला आहे. या ट्वीटनंतर कंगनावर टीकेची झोड उठली होती. यामुळे तिने ते ट्वीट डिलीट केले होते. मोहिंदर कौर या पंजाबच्या भटिंडा येथील रहिवासी आहेत.

    Kangana Ranaut in trouble again, notice in defamation case, order to appear in Bathinda court

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य