• Download App
    कंगना वक्तव्यावर ठाम, वरुण गांधींना म्हणाली जा आणि रडत बस|Kangana insisted on the statement, told Varun Gandhi go and cry

    कंगना वक्तव्यावर ठाम, वरुण गांधींना म्हणाली जा आणि रडत बस

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : १९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य भीक असून खरं स्वातंत्र २०१४ साली मिळाले या आपल्या वक्तव्यावर अभिनेत्री कंगना रनौत ठाम आहे. यारून नाराजी व्यक्त करणारे भाजपाचे खासदार वरुण गांधी यांच्यावर तिने हल्लाबोल केला आहे. तिने वरूण गांधीना जा आणि रडत बस असं म्हटले आहे.Kangana insisted on the statement, told Varun Gandhi go and cry

    टाईम्स नाऊ समिट २०२१ या कार्यक्रमात भिकेत मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य असत का असा सवाल करत कंगणाने खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाल्याचे सांगितले. यावरून वरुण गांधी कंगणावर निशाणा साधत म्हणाले होते की,



    कधी महात्मा गांधीजींच्या त्याग आणि तपस्येचा अपमान, कधी त्यांच्या मारेकºयाचा सन्मान आणि आता शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंह ,चंद्रशेखर आजाद, नेताची सुभाष चंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिक ज्यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली त्यांचा तिरस्कार. या विचारसरणीला वेड म्हणायचं की देशद्रोह ?
    ट्विटरवर अकाऊंटला बंदी असल्याने कंगनाने वरुण गांधी यांना इन्स्टाग्रामवर उत्तर दिले आहे.

    वरुण गांधी यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत कंगना म्हणाली, मी १८५७ सालच्या देशाच्या पहील्या स्वातंत्र्य संग्रामाचा उल्लेख केला होता. जो अयशस्वी झाला. त्यावेळी आपल्याला ब्रिटीशांची क्रूरता आणि अत्याचार सहन करावे लागले होते. त्यानंतर जवळपास १०० वर्षांनंतर गांधीनी भिक मागितल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. जा आणि रडत बस असेही तिने वरुण गांधींना म्हटले आहे.

    Kangana insisted on the statement, told Varun Gandhi go and cry

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य