विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीला वेढून बसलेल्या शेतकरी आंदोलनाविरोधात अभिनेत्री कंगना राणावत हिने अनेकदा वक्तव्ये केली. त्या विरोधात संताप व्यक्त करताना सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सच्या एका महिला कॉन्स्टेबलने आज कंगना राणावत हिला चंदिगड विमानतळावर थप्पड मारली. आपल्या कृतीचे कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने समर्थन केले. त्यामुळे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स ने कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिला निलंबित केले आहे. Kangana after allegedly being slapped by security staff at Chandigarh airport
कंगना राणावत मंडी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आली आहे. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला जाण्यासाठी कंगना चंदीगड विमानतळावरून दिल्लीला येणार होती. कंगना चंदीगड विमानतळावर पोहोचली. त्यावेळी सिक्युरिटी पोस्ट पाशी कॉन्स्टेबल कुलविंदर कौर तैनात होती. कंगनाला पाहताच कुलविंदर कौरने तिला थप्पड मारली. नेमके काय होते हे कळायच्या आत की तिथून बाजूलाही झाली.
परंतु एका खासदाराला ड्युटीवर असणाऱ्या कॉन्स्टेबलने थप्पड मारणे ही घटना खूप गंभीर ठरली. तिथे ड्युटीवर असलेल्या इतर सुरक्षाकर्मींनी कुलविंदर कौर हिला ताबडतोब घेरले. तिला तिथून बाजूला केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. कंगना राणावत हिने आंदोलनाला बसलेले शेतकरी 100 रुपयांची मजुरी घेऊन आंदोलन करत आहेत, असा आरोप केला होता. त्या आंदोलकांमध्ये माझी आई तिथे बसली होती. त्यामुळे कंगनावर माझा राग होता म्हणून मी कंगनाला थप्पड मारली, अशा शब्दांत कुलविंदर कौर हिने आपल्या कृतीचे समर्थन केले.
एका खासदाराला थप्पड मारून आपल्या कर्तव्याच्या विरोधात हिंसक कृती केल्याबद्दल कुलविंदर कौर हिला सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सने नोकरीतून निलंबित केले आहे. तिची खातेनिहाय चौकशी होणार आहे. कंगना राणावतीने त्या पाठोपाठ एक व्हिडिओ जारी करून आपली भूमिका मांडली. आपण देशातला दहशतवाद कोणत्या प्रकारे कमी करू शकणार आहोत??, असा खोचक सवाल तिने केला. कंगना राणावत हिची शेतकरी आंदोलनासंदर्भातली भूमिका आणि तिला बसलेली थप्पड यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन दिल्लीतल्या खान मार्केट इको सिस्टीमने चर्चेत आणले आहे.
Kangana after allegedly being slapped by security staff at Chandigarh airport
महत्वाच्या बातम्या
- NDA 8 जून करू शकते सरकार स्थापनेचा दावा; राष्ट्रपती भवनात 9 जूनला शपथविधीची शक्यता
- दिल्ली विमानतळावर स्टालिन + चंद्राबाबू यांच्यात नुसत्याच गाठीभेटी; की NDA – INDI आघाडीत एकमेकांची सेंधमारी??
- मुस्लिम प्रभाव क्षेत्रात एकगठ्ठा मतदानाचा भाजपला देशभरात 30 % फटका!!; ममता + राहुल + अखिलेश + उद्धव या “लाभार्थीं”च्या जागा वाढल्या!!
- NDAच्या बैठकीपूर्वी नितीश सरकारने केली ‘ही’ मोठी मागणी