• Download App
    Kamal Hasan : राज्यसभा निवडणुकीसाठी कमल हसन यांनी दाखल केला अर्ज

    Kamal Hasan : राज्यसभा निवडणुकीसाठी कमल हसन यांनी दाखल केला अर्ज

    मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची देखील होती उपस्थिती Kamal Hasan

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : प्रसिद्ध अभिनेते आणि एमएनएम प्रमुख कमल हसन यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन देखील उपस्थित होते Kamal Hasan

    निवडणूक आयोगाने अलीकडेच राज्यसभेच्या आठ जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. या द्वैवार्षिक निवडणुका १९ जून रोजी होणार आहेत. यामध्ये आसाम आणि तामिळनाडू या दोन राज्यांच्या आठ जागांवर द्वैवार्षिक निवडणुका होणार आहेत.



    आठ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. अशा परिस्थितीत या आठही जागांसाठी मतदान होणार आहे. त्याच वेळी, १९ जून रोजी संध्याकाळी मतमोजणी देखील होईल. आसामच्या दोन आणि तामिळनाडूच्या सहा जागांवर मतदान होणार आहे. Kamal Hasan

    ज्येष्ठ अभिनेते कमल हसन सध्या त्यांच्या ‘ठग लाइफ’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनवेळी केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. फिल्मच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी केलेल्या एका विधानामुळे कर्नाटकात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कमल हसन यांनी म्हटले होते की, “कन्नड भाषेचा उगम तामिळ भाषेतून झाला आहे.” त्यांच्या या विधानामुळे कर्नाटकात संतापाची लाट उसळली असून, हा वाद थेट न्यायालयात पोहचला आहे

    Kamal Haasan files nomination for Rajya Sabha elections

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले- ट्रम्प खरे बोलले की भारतीय अर्थव्यवस्था मृतावस्थेत

    Election Commission : ईव्हीएममध्ये छेडछाड अशक्यच , निवडणूक आयोगाचा स्पष्ट दावा

    Piyush Goyal : भारत ‘डेड इकॉनॉमी’ नाही, तर जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था, पियुष गोयल यांचे ट्रम्प यांना दिले उत्तर