• Download App
    शिस्तभंगाची टांगती तलवार असलेले के. व्ही. थॉमस म्हणतात, काँग्रेस अध्यक्ष गांधी परिवारातलाच हवा!!|K. with a hanging sword of discipline. V. Thomas says, Congress President should belong to Gandhi family only

    शिस्तभंगाची टांगती तलवार असलेले के. व्ही. थॉमस म्हणतात, काँग्रेस अध्यक्ष गांधी परिवारातलाच हवा!!

    वृतसंस्था

    तिरुवनंतपुरम : काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर मोठे राजकीय घमासान सुरू असताना तसेच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे काँग्रेसच्या अंतर्गत बाबींविषयी महत्त्वाचे सल्ले देत असतात. केरळचे काँग्रेसचे नेते के. व्ही. थॉमस यांचे एक महत्त्वाचे विधान पुढे आले आहे.K. with a hanging sword of discipline. V. Thomas says, Congress President should belong to Gandhi family only

    काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी गांधी परिवारातील व्यक्ती पुढे यावी, असे वक्तव्य थॉमस यांनी केले आहे. पण थॉमस यांच्या वक्तव्याचे एक वेगळे वैशिष्ट्य देखील आहे. त्यांच्यावर सध्या शिस्तभंगाच्या कारवाईची टांगती तलवार लटकत आहे. थॉमस यांनी काही दिवसांपूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने भरविलेल्या धर्मनिरपेक्ष संमेलनाला हजेरी लावली होती. केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता काँग्रेसच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया करत असताना थॉमस यांनी त्या पक्षाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावणे हे काँग्रेस हायकमांडला रूचलेले नाही.



    त्यामुळे त्यांना केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के. सुधाकर यांनी नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले आहे. थॉमस यांनी आपण शिस्तभंग केल्याचा दावा फेटाळला आहे. पण त्याच वेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष पदावर गांधी परिवारातील व्यक्ती आहे असे वक्तव्य करून आपल्या निष्ठा गांधी परिवाराशी संलग्न असल्याचा निर्वाळा देण्याचा प्रयत्न केला आहे.

    या पार्श्वभूमीवर थॉमस यांच्यावर काँग्रेस पक्ष शिस्तभंगाची कारवाई करणार की त्यांना गांधी परिवारावर निष्ठा दाखवल्याबद्दल विशेष सूट देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    K. with a hanging sword of discipline. V. Thomas says, Congress President should belong to Gandhi family only

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य