• Download App
    |केरळमध्ये डाव्यांच्या गडावर या रणरागिणीचा बंडाचा झेंडा, बिनतोड युक्तीवादाने मतदार भारावले K.K.Rima targets left front in kerala

    केरळमध्ये डाव्यांच्या गडावर या रणरागिणीचा बंडाचा झेंडा, बिनतोड युक्तीवादाने मतदार भारावले

    विशेष प्रतिनिधी 

    तिरूअनंतपुरम : वरकरणी साध्या घरकाम करणाऱ्या महिलेसारखी तिची वेशभूषा.. पण ती जेव्हा बोलू लागते, तेव्हा रस्त्यांवर चालणारी पावलं अचानक थांबतात. तिच्या भाषणात बिनतोड युक्तिवाद असतो.K.K.Rima targets left front in kerala

    अत्यंत संयमी भाषेत ती सारं काही सांगू पाहते. केरळध्ये रिव्होल्युशनरी मार्क्सवादी पक्षाच्या नेत्या के.के. रिमा यांची सध्या जोरदार चर्चा आहे.



    राजकीय रणधुमाळीमध्ये उतरलेल्या या रणरागिनीनं डाव्यांच्या आक्रमक प्रचाराला सडेतोड उत्तर दिलंय रिमा यांच्यासाठी राजकारण नवं नाही. ‘आरएमपी’चे संस्थापक नेते दिवंगत टी.पी. चंद्रशेखरन यांच्या त्या पत्नी होत.

    कधीकाळी याच राजकीय संघर्षामध्ये त्यांच्या पतीचा बळी गेला होता. सध्या रिमा या वडाकारा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत.चंद्रशेखरन यांच्या हत्येनंतर जेव्हा शवविच्छेदन अहवाल रिमा यांच्या हाती आला तेव्हा त्यांना मोठाच धक्का बसला होता.

    स्थानिक पातळीवर टीपी या नावाने लोकप्रिय असणाऱ्या त्यांच्या पतीवर हल्लेखोरांनी कोयत्यांनी ५१ वार केले होते. केरळच्या इतिहासातील हे सर्वांत क्रूर राजकीय हत्याकांड समजले जाते. आता रिमा प्रचारादरम्यान डाव्यांच्या या अत्याराविरोधात आवाज उठविताना दिसतात.

    काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडीने रिमा यांना पाठिंबा दिला आहे. चंद्रशेखरन यांनी त्यांच्या हयातीमध्येच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला शेवटचा लाल सलाम ठोकत स्वतःचा वेगळा सुभा मांडला होता.

    पुढे २०१२ मध्ये स्थानिक गुंडांनी केलेल्या हल्ल्यामध्ये चंद्रशेखरन यांना प्राण गमवावे लागले होते. रिमा यांनी तेव्हापासून राजकारणाच्या नावाखाली राज्यामध्ये होणाऱ्या हत्यांविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली.

    K.K.Rima targets left front in kerala

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य