• Download App
    नागपुरातील भटक्या कुत्र्यांना दररोज चिकन बिर्याणीची मेजवानी ; कोरोनाच्या काळात भूतदयेचा उपक्रम।Jyotish Ranjit Nath Feeds Chicken Biryani to Street Dogs

    नागपुरातील भटक्या कुत्र्यांना दररोज चिकन बिर्याणीची मेजवानी ; कोरोनाच्या काळात भूतदयेचा उपक्रम

    वृत्तसंस्था

    नागपूर : कोरोना काळात नागपुरातील सुमारे 150 कुत्र्यांना दररोज चिकन बिर्याणीची मेजवानी दिली जात आहे ज्योतिष रंजीत नाथ हा उपक्रम राबवित आहेत. कोरोना काळात राबविलेल्या भूतदयेच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. Jyotish Ranjit Nath Feeds Chicken Biryani to Street Dogs

    रंजीत दादा या टोपण नावाने लोक त्यांना ओळखतात. सध्या कोरोनाच्या काळात अनेकांना एकवेळचं जेवण मिळणंही अवघड झालं आहे. अशात नागपुरच्या रस्त्यावरील भटकी कुत्री चिकन बिर्याणीवर ताव मार्ट आहेत.



    कोरोनाचा प्रसार वाढल्यापासून 58 वर्षीय रंजीत दररोज 35 किलो बिर्याणी बनवतात. त्यांचे सहकारी राहुल मोटवानी यांनी सांगितलं, की अनेक वर्षांपासून ते हे काम करत आहेत. मात्र, कोरोना महामारी सुरू झाल्यापासून त्यांनी ते वाढवल आहे. रंजीत यांना भटके श्वान आवडतात आणि त्यांना ते आपली मुलं असल्यासारखं मानतात.

    आता या उपक्रमात रंजीत यांना लोकांकडूनही आर्थिक मदत मिळत आहे. मोटवानी यांनी सांगितलं, की एका फूड ब्लॉगरनं रंजीत यांचा व्हिडिओ शूट करुन पोस्ट केला होता. यानंतर रंजीत यांना देणगी मिळू लागली.

    Jyotish Ranjit Nath Feeds Chicken Biryani to Street Dogs

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट